
ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत खून प्रकरणातील वारसांना मिळणार नोकरी; धाराशिव जिल्ह्यातील ८ वारसांना गट – ड पदावर नियुक्ती.
- प्रतिनिधी : परंडा : फारुख शेख :- दि. 24/5/2026 नॅ शनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या सामाजिक संघटणे चे राज्य महासचिव ॲड.डॉ.केवल ऊके, राज्य सचिव वैभ व गिते यांनी गेली दहा वर्षापासून ॲट्रॉसिटी ॲक्ट काय द्याअंतर्गत अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व खुन प्रकरणात शास कीय नोकरी देण्याची मागणी लावून धरली होती.
- या मागणीसाठी संघटणेच्या राज्यातील कार्यकर्ते व पदा धिकारी यांना सोबत घेऊन मंत्रालय तसेच राज्याच्या विवि ध कार्यालयांच्या समोर विविध प्रकारची निदर्शने आंदोल ने करुन प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटुन कायदेशीर पाठ पुरावा केला केला होता.

- नियोजनबद्ध केलेल्या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने दि.२५/११/२०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित करुन स न २०१२ पासून राज्यात झालेल्या सर्व खुन प्रकरणातील एका कायदेशीर वारसांना वर्ग ड ची शासकीय नोकरी दे ण्याचा निर्णय घेतला आहे.
- तसेच जे वारस नोकरीस पात्र नाहीत त्यांना दोन एकर जमीन दिली जाणार आहे.
- एन.डी.एम जे संघटनेचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत यांच्यासह संघटणेच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी धाराशिव जिल्ह्यात झालेल्या खुन प्रकरणा त शासकीय नोकरी, जमीन, पेन्शन देण्याची मागणी करु न पाठपुरावा केला होता.
- १५ खुन प्रकरणात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू अ सलेल्या महागाई भत्यासह दरमहा 5 हजार रुपये पेन्शन चालू करण्यासाठी श्री राऊत यांना यश आले होते.
- त्यानंतर शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सन २०१२ पा सुन धाराशिव जिल्ह्यात २६ खुन प्रकरणे झाली आहेत.
- धाराशिवच्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या मासि क बैठकीत १५ खुन प्रकरणातील वारसांचे प्रस्ताव पात्र ठरवण्यात आले असुन नियुक्ती देण्यासाठी प्रादेशिक उपा युक्त समाज कल्याण लातूर यांचेकडे पाठवण्यात आले होते.
- त्यापैकी १२ प्रकरणातील वारसांना गट ड पदावर नियुक्ती देण्यासाठी आयुक्त समाज कल्याण पुणे यांनी मान्यता दिली आहे.
- त्यापैकी कागदपत्रांची पूर्तता केलेल्या ८ खुन प्रकरणाती ल वारसांना गट ड पदावर नियुक्ती देण्यात आली. असुन इतर ४ वारसांची कागदपत्रे अपुर्ण असल्याने नियुक्ती देता आली नसल्याची माहिती धाराशिवचे जिल्हाधिकारी की र्तीकिरण पुजार व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी सचिन कवले यांनी पत्राद्वारे दिल्याची माहिती एन डी एम जे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत यां नी प्रसार माध्यमांना दिली आहे.
- चौकोट
- धाराशिव जिल्ह्यातील सन २०१२ पासुन ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत खून झालेल्या प्रकरणातील सर्व वारसांना (वर्ग-ड) ची शासकीय नोकरी मिळणार आहे.
- शासनाने ठरवुन दिलेल्या वेळेत अर्ज करावेत:- अजिनाथ राऊत (जिल्हाध्यक्ष धाराशिव नॅशनल दलीत मुव्हमेंट फॉर जस्टिस)
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






