
दिव्यांग कायद्यानुसार ॲट्रॉसिटी प्रकरणातील आरोपींना १६ दिवसांची न्यायालयीन कोठडी; चिंचपूर खुर्द येथील घटनेनंतर दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य संघटना पीडितांच्या पाठीशी.
- प्रतिनिधी : परंडा : फारुख शेख :- परंडा तालुक्यातील चिंचपूर (खुर्द) येथे दिव्यांग अशोक भराडे व त्यांच्या कुटुं बीयांवर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात आंबी पोलीस ठाण्यात दिव्यांग अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- या प्रकरणात पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित आरोपी दादा पोपट भराडे, कल्याण भराडे, पोपट एकना थ भराडे यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना १६ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

- आंबी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ खरड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
- घटनेनंतर दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजि क संघटनेने पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला.
- संघटनेच्या हस्तक्षेपामुळे पोलिस प्रशासनाने ठोस भूमिका घेत कारवाई केल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.
- या प्रकरणामुळे दिव्यांग बांधवांमध्ये “आपल्या हक्कासा ठी लढणारी संघटना” अशी भावना निर्माण झाली असून संघटनेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
- दिव्यांगांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे तानाजी घोडके यांच्या नेतृत्वाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
- दरम्यान, न्यायालयीन प्रक्रियेनंतर संबंधित आरोपींला प्र त्येकी ५०,००० हजार रुपये दंड ठोठावून जामिनावर सुट का करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






