नदीतील विद्युत पंप काढताना विजेचा धक्का लागून दोन तरुण शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू ; परंडा तालुक्यातील कपिलापुरी येथील हृदयद्रावक घटना; गावात शोककळा.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील कपिलापुरी येथे शुक्रवारी सायंकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली.
  • नदीपात्रातील विद्युत पंप पाण्यातून बाहेर काढत असता ना विजेचा तीव्र धक्का लागल्याने दोन तरुण शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.
  • ही घटना शुक्रवारी (दि. २९) सायंकाळी ६ वाजेच्या सुमा रास घडली असून, यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
  • अनिल देवळकर-जैन (वय ४० वर्षे) आणि अक्षय कुंभार (वय ३० वर्षे, दोन्ही रा.कपिलापुरी, ता.परंडा) अशी विजे चा धक्का लागून मृत्यू झालेल्या दोन तरुण शेतकऱ्यांची नावे आहेत.
  • मिळालेल्या माहितीनुसार, कपिलापुरी येथील शेतकरी अ निल जैन यांच्या शेतातील नदीपात्रात असलेल्या विद्युत पंपात बिघाड झाला होता.
  • हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी आणि विद्युत पंप पाण्यातू न बाहेर काढण्यासाठी अनिल जैन आणि अक्षय कुंभार हे दोघे नदीपात्रात उतरले होते.
  • मात्र, पंप बाहेर काढत असताना अचानक विद्युत प्रवाहा चा जोराचा धक्का लागल्याने हे दोन्ही तरुण शेतकरी पाण्यातच कोसळले.
  • विजेचा शॉक अत्यंत तीव्र असल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
  • या घटनेची माहिती मिळताच कपिलापुरी परिसरातील ना गरिकांनी नदीपात्राकडे धाव घेतली.घटनेची माहिती मिळ ताच परंडा पोलीस पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
  • पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा केला. दोन तरुण आणि कमावत्या शेतकऱ्यांचा असा अचानक दुर्दैवी अंत झाल्या ने कपिलापुरी गावावर शोककळा पसरली आहे.
  • या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत आ कस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles