परंडा तालुक्यात ग्राहकांच्या संमतीशिवाय ‘स्मार्ट मीटर’ बसवणे बंद करा; माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने  मा.श्री.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेब आणि उर्जामंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई साहेब याणा दिले निवेदन.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यात वी ज ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय आणि कोणतीही पूर्वसू चना न देता मनमानी पद्धतीने ‘स्मार्ट मीटर’ बसवण्याचा धडाका महावितरणने सुरू केला आहे.
  • हा प्रकार बेकायदेशीर असून हे स्मार्ट मीटर तात्काळ काढ ण्यात यावेत, सक्तीने मीटर बसवणे बंद करावे आणि दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करावी, अ शी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, परंडा यांच्या वतीने करण्यात आली आहे.
  • या संदर्भात मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मा.उपमु ख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हाराष्ट्र राज्य, श्रीमती मेघ ना दीपक सांकोरे बोर्डीकर मॅडम मा.राज्यमंत्री(उर्जा विभा ग ) श्रीमती आबा शुक्ला मॅडम ( भा प्र से ) अपर मुख्य स चिव ( ऊर्जा ) मराष्ट्र शासन जिल्हाधिकारी कार्यालय धारा शिव, महावितरणचे अधीक्षक कार्यालय धाराशिव तहसी लदार तहसील कार्यालय परांडा. उप अभियंता महावितर ण कंपनी परंडा. यांना जाहीर निवेदन देण्यात आले आहे.
  • या निवेदनात म्हटले आहे की खाजगी जागेत घुसखोरी आणि नियमांचे उल्लंघननिवेदनात नमूद केल्याप्रमाणे, प रंडा तालुक्यातील अनेक गावांमध्ये महावितरणचे कर्मचा री आणि कंत्राटदार ग्राहकांच्या अनुपस्थितीत किंवा त्यां ना कोणतीही पूर्वकल्पना न देता खाजगी जागेत प्रवेश करत आहेत.
  • जुने विद्युत मीटर काढून त्या जागी नवीन स्मार्ट मीटर बसवले जात आहेत.
  • विद्युत कायदा २००३ आणि ग्राहक संरक्षण कायदा २० १९ नुसार, ग्राहकाचा मीटर बदलण्यापूर्वी त्याची लेखी सं मती घेणे, बदलाचे कारण लेखी कळवणे आणि जुन्या मीटरचे अंतिम रीडिंग ग्राहकासमक्ष नोंदवणे बंधनकारक आहे.
  • मात्र,महावितरणकडून या सर्व नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचा आरोप महासंघाने केला आहे.
  • ग्राहकांमध्ये भीती आणि असंतोषाचे वातावरण स्मार्ट मी टर बसवण्याबाबत ग्राहकांना कोणतीही लेखी माहिती दिली जात नाही.
  • या मीटरचा खर्च, बिलिंग पद्धती आणि अचूकतेविषयी महावितरणकडून कोणतीही पारदर्शकता ठेवली गेलेली नाही.
  • त्यामुळे अचानक येणाऱ्या अतिरिक्त बिलांविषयी आणि वाढीव दरांबद्दल सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये प्रचंड भी ती व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या प्रमुख मागण्या: १. ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय बसवलेले सर्व ‘स्मार्ट मीटर’ तात्काळ काढून त्या जागी जुने मीटर पूर्ववत बस वावेत.
  • २. जोपर्यंत शासनाचा स्पष्ट लेखी आदेश आणि ग्राहकां ची १००% लेखी संमती मिळत नाही, तोपर्यंत तालुक्यात नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम पूर्णपणे बंद ठेवावे.
  • ३. ग्राहकांच्या परवानगीशिवाय खाजगी जागेत घुसून मी टर बदलणाऱ्या संबंधित अधिकारी व कंत्राटी कामगारांवर विद्युत कायदा २००३ च्या कलम १६३, १६४ आणि भार तीय न्याय संहिता (पूर्वीचे IPC कलम ४४१, ४४७) नुसार गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी.
  • सदर बेकायदेशीर कृत्यामुळे तालुक्यात तीव्र असंतोष प सरला असून, प्रशासनाने यावर तातडीने पावले उचलून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्या त येईल असा इशाराही माहिती अधिकार कार्यकर्ता महा संघ परंडाच्या वतीने देण्यात आला आहे.
  • या निवेदनावर फारूक शेख . कानिफनाथ सरपने विजय मेहर, आमित आगरकर, धनजय गोफने, जमिर शिकलक र व कूभेफळ ता परंडा येथील कंजूमर शमशुद्दीन सय्यद, सतीश सोनटक्के, यास्मिन शेख. विक्रम आडगळे, उज्व ला हजारे, सुनिता सोनटक्के, सर्जेराव सोनटक्के, बळीराम आवाळे, रत्नमाला कांबळे, गंधार बाई कावरे, भानुदास मेहेर इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles