
परंडा येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या निवेदनाची दखल; विनासंमती स्मार्ट मीटर बसवणाऱ्यांवर कारवाईचे तहसीलदारांचे आदेश.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने नागरिकांच्या बाजूने पुकारलेल्या लढ्याला मो ठे यश आले आहे.
- परंडा तालुक्यातील वीज ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय बसवलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढण्याचे आणि नवीन मीटर सक्तीने बसवणे बंद करण्याचे आदेश परंडा तहसी लदारांनी दिले आहेत.
- या प्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहेत.

- काय आहे संपूर्ण प्रकरण….?
- माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने दिनांक २९ मे २०२४ रोजी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना एक खळबळजनक निवेदन दे ण्यात आले होते.
- या निवेदनात महावितरणकडून सुरू असलेल्या सक्तीच्या स्मार्ट मीटर मोहिमेवर तीव्र आक्षेप घेण्यात आला होता.
- वीज ग्राहकांच्या खाजगी जागेत त्यांच्या लेखी संमती शिवाय प्रवेश करून जुने मीटर बदलण्यात आल्याचा आरोप महासंघाने केला होता.
- निवेदनातील प्रमुख मागण्या:
- ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय बसवलेले स्मार्ट मीटर तात्काळ काढण्यात यावेत.
- नवीन स्मार्ट मीटरची सक्ती पूर्णपणे आणि तात्काळ बंद करण्यात यावी.
- ग्राहकांच्या संमतीशिवाय त्यांच्या खाजगी जागेत घुसणा ऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल व्हावेत.
- तहसीलदारांची धडक कारवाई
- या गंभीर निवेदनाची दखल घेत माननीय तहसीलदार, परं डा यांनी दिनांक १ जून २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (म.रा.वि.वि.कं.) परंडा येथील कार्यका री अभियंत्यांना कडक लेखी आदेश जारी केले आहेत.
- या आदेशानुसार, ज्या अधिकाऱ्यांकडे किंवा कर्मचाऱ्यां कडे ग्राहकांचे संमती पत्र नसेल, त्यांच्यावर विविध काय द्यांच्या तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

- तहसीलदारांच्या या भूमिकेमुळे सक्तीने मीटर बसवणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, तालु क्यातील सामान्य वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






