ग्रामपंचायत आखाडा पेटला….! वार्डवाईस आरक्षण अंतिम टप्प्यात; ‘भावी’ सरपंचांची गावात हवा, पण मतदार राजा मात्र शांतआखाडा. 

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- ग्रामपंचायत निवड णुकीचे बिगुल वाजले असून गावागावांतील राजकीय आ खाडा चांगलाच पेटला आहे.
  • येत्या १२ तारखेपर्यंत वार्डवाईस आरक्षण अंतिम होणार असल्याने इच्छुकांनी आतापासूनच कंबर कसली आहे.
  • आरक्षण काय सुटणार याकडे सर्वांचे डोळे लागले असून, दुसरीकडे सरपंच आणि सदस्य पदासाठी इच्छुकांनी मत दारांच्या गाठीभेटी घेत संपर्क वाढवला आहे.
  • गावातील पारावर, प्रमुख चौकात आणि समाजमंदिरांम ध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्याच चर्चा रंगत आहेत.
  • तरुणाईमध्ये ‘क्रेझ’; कामाचे श्रेय घेण्यावरून रस्सीखेचया वेळच्या निवडणुकीत नवशिका तरुण वर्ग मोठ्या संख्येने पुढे येत आहे.
  • “तू काय काम केलेस? मी हे काम करणार!” अशा प्रकार च्या राजकीय चढाओढी सध्या गावांमध्ये पाहायला मिळ त आहेत.
  • गावातील एखाद्या कामाचे श्रेय घेण्यासाठी एका बाजूला तरुण उत्सुक असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात काम कोणी केले आणि त्याचे ‘क्रेडिट’ तिसराच लाटत असल्याच्या रंज क चर्चाही गावातील कट्ट्यांवर ऐकायला मिळत आहेत.
  • घरचे पाणी माहीत नाही, पण स्वप्न सरपंचपदाचे…!निवड णुकीच्या या धामधुमीत गावांमध्ये अनेक मजेशीर आणि विरोधाभासी चित्र पाहायला मिळत आहे.
  • घरात कधी तांब्याभर पाणी स्वतः घेऊन न पिणारे आणि चौकात इतरांकडे तंबाखू मागून खाणारे हौसे-नवसे-गवसे ही आज “मीच पुढचा सरपंच किंवा सदस्य होणार” असा छातीठोक दावा करत फिरत आहेत.
  • मात्र, अशा उमेदवारांना गावातील मूलभूत अडचणींची साधी माहितीही नसल्याचे ग्रामस्थ बोलून दाखवत आहेत.
  • विकासाचा पत्ता नाही; पांढरे कपडे अन् पार्ट्यांचीच हवा गावामध्ये वीज वेळेवर राहते की नाही…? पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध आहे का….? गटारींची वेळेवर साफसफाई होते का….? रस्त्यावरील विजेच्या खांबांवर बल्ब सुरू आहेत की बंद….? या प्राथमिक गरजांकडे या इच्छुकांचे अजिबात लक्ष नसते.
  • गरीब ग्रामस्थांच्या अडीअडचणीला, सुख-दुःखाला किंवा अंत्यविधीला जाण्यासाठी या नेत्यांकडे वेळ नसतो.
  • मात्र, लग्नकार्यात पांढरे शुभ्र कपडे घालून मिरवायचे, दा रू पिऊन गोंधळ घालायचा आणि स्वतःला नेते म्हणवून घ्यायचे, अशीच काहींची पद्धत बनली आहे.
  • गावात कुठलीही जयंती आली की वर्गणी जमा करायची, पार्ट्या करायच्या आणि गावापुढे नाचत “माझ्या मागे कि ती पोरे आहेत” हे दाखवण्याचा फुकाचा आव आणला जात आहे.
  • मतदार दाखवणार जागा; जनताच ठरणार ‘किंगमेकर’ इ च्छुक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी किती ही चमकोगिरी करत असले, तरी गावातील सामान्य मतदा र आता चांगलाच शहाणा झाला आहे.
  • आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी कोणी कोणाला त्रास दि ला, गावात हुकूमशाही कोणी चालवली आणि संकटसम यी कोण पाठीशी उभे राहिले, याचा हिशोब मतदारांनी मनाशी पक्का केला आहे.
  • “आम्ही पाठीमागे काय केले आणि किती जणांना त्रास दि ला, याची जाणीव उमेदवारांना असो वा नसो, पण मतदार राजा निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना त्यांची योग्य जा गा दाखवल्याशिवाय राहणार नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया सुज्ञ ग्रामस्थांमधून उमटत आहे.
  • अखेर गावात सरपंच कोण होणार आणि सदस्य कोण ब नणार, याचा अंतिम फैसला जनताच करणार आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles