
कुंभेफळ ग्रामपंचायत प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर; राजकीय हालचालींना वेग.
- प्रतिनीधी : फारुख शेख :- कुंभेफळ ग्रामपंचायत येथे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्राधिकारी अधिका री महेश सातपुते, सहाय्यक ग्राम महसूल अधिकारी दत्ता वाघमारे व ग्रामविकास अधिकारी देवकते याणी कुंभेफळ ग्रामपंचायतीची आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत नुकतीच शासकीय नियमांनुसार संपन्न झाली आहे.
- आरक्षण जाहीर होताच गावात राजकीय वातावरण तापू लागले असून इच्छुकांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

- जाहीर झालेल्या प्रभाग रचना आणि आरक्षणानुसार प्रभा गांची स्थिती खालीलप्रमाणे आहे:
- प्रभाग निहाय आरक्षण सोडत:
- प्रभाग क्रमांक १:’अ’ जागा: नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) महिला. ‘ब’ जागा: सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) पुरुष किंवा महिला.
- प्रभाग क्रमांक २: ‘अ’ जागा: अनुसूचि त जाती (SC) पुरुष/महिला.’ब’ जागा: सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) महिला.’क’ जागा: सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) महिला.
- प्रभाग क्रमांक ३:‘अ’ जागा: सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) महिला.’ब’ जागा: सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) पुरुष किंवा महिला. ग्रामस्थांची मोठी उपस्थिती:
- या महत्त्वपूर्ण आरक्षण सोडत प्रक्रियेप्रसंगी गावातील प्रमु ख नागरिक आणि राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- गणेश नायकोडे, उपसरपंच फारूक शेख . फकीर पठाण, ग्रामपंचायत सदस्य रामा आवळे, बळीराम आवाळे,योगेश आवाळे,किशोर गायकवाड, जेजेराम नायकोडे, सुभाष जा धव, भाऊसाहेब नायकोडे, अक्षय कोटोळे, प्रकाश कापसे, आयूब शेख, साहील शेख, यांच्यासह अनेक ग्रामस्थ उप स्थित होते.
- नवीन प्रभाग रचनेमुळे काही जुन्या इच्छुकांचे गणीत बिघ डले आहे, तर अनेकांसाठी नव्या संधी निर्माण झाल्या आहेत.
- महिलांसाठी आरक्षित जागांची संख्या लक्षणीय असल्या ने यावेळी ग्रामपंचायतीत महिला राज पाहायला मिळणार आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






