
धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धसका; धाराशिव जिल्ह्यात दुधाची आवक शेकडो लिटर्सने घटली.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-धाराशिव:अन्न व औ षध प्रशासन (FDA) आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच डॅशिं ग सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात भेसळ खोरांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे.
- त्यांच्या या कडक पावलांमुळे राज्यातील भेसळखोरांचे धाबे दणाणले असून,याचा थेट परिणाम धाराशिव जिल्ह्या त पाहायला मिळत आहे.
- कारवाईच्या भीतीने जिल्ह्यातील दुधाची आवक एकाए की शेकडो लिटर्सने घटल्याची धक्कादायक माहिती समो र आली आहे.

- तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अन्न पदार्थां मधील, विशेषतः दुधातील भेसळ रोखण्यासाठी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे.
- राज्यभरात ठिकठिकाणी दुधाचे टँकर, संकलन केंद्रे आ णि डेअऱ्यांवर अचानक छापे टाक सत्र सुरू झाले आहे.
- या धडाकेबाज कारवाईमुळे बनावट आणि भेसळयुक्त दूध बाजारात आणणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
- कारवाईच्या भीतीने पुरवठादार भूमिगत….?धाराशिव जि ल्ह्यात रोज मोठ्या प्रमाणावर दुधाची आवक आणि विक्री होते.
- मात्र, नवीन आयुक्तांच्या धाकामुळे भेसळयुक्त दुधाचा काळा व्यवसाय करणारे पुरवठादार कमालीचे धास्तावले आहेत.
- पकडले गेल्यास थेट तुरुंगाची हवा खावी लागेल, या भीती ने अनेकांनी बनावट दुधाचा पुरवठा तात्काळ थांबवला आहे.
- परिणामी,जिल्ह्यातील दुधाच्या नियमित आवकेमध्ये अचा नक शेकडो लिटर्सची घट झाली आहे.
- ग्राहकांकडून मुंढे यांच्या मोहिमेचे स्वागतदूध आवक कमी झाली असली, तरी यामुळे बाजारातील रासायनिक आणि आरोग्याला घातक असणारे भेसळयुक्त दूध रोखण्यास मदत होत असल्याचे चित्र आहे.
- सर्वसामान्य नागरिकांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या धडक कारवाईचे जोरदार स्वागत केले असून, धाराशिव जिल्ह्यातही अशाच प्रकारे थेट डेअरी आणि संकलन केंद्रांवर कडक तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






