
परंडा शहरात विजेचा लपंडाव बंद करा, अन्यथा खुर्च्या सोडा!माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा थेट मुख्यमंत्र्यांसह प्रशासनाला इशारा.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विजेचा खेळखंडोबा आणि लपंडाव त्वरित बंद करा, अन्यथा आपल्या खुर्च्या रिकाम्या करा,” अशी आक्रमक मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.
- यासंदर्भात महासंघाने थेट माननीय मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, धाराशिवचे जिल्हाधिकारी, लातूरचे मुख्य अभियंता, परंड्याचे तहसीलदार आणि महावितरणच्या वरिष्ठ अधि काऱ्यांना लेखी निवेदन पाठवून तीव्र संताप व्यक्त केला आहे.
- महावितरणचे काम फक्त वसुली आणि स्मार्ट मीटर पुरते च?नागरिकांनी दिलेल्या निवेदनात महावितरणच्या कार भारावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
- परंडा शहरात दिवसेंदिवस वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे.
- या समस्येबाबत जेव्हा जागरूक नागरिक किंवा व्यापारी महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना फोन करतात, तेव्हा त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात किं वा फोन उचललेच जात नाहीत.
- “महावितरणचे काम फक्त वीज बिल वसुली करणे आणि ग्राहकांच्या संमतीशिवाय ‘स्मार्ट मीटर’ बसवणे एवढेच उर ले आहे का?” असा संतप्त सवाल महासंघाने केला आहे.
- निष्काळजीपणामुळे नागरिक आणि व्यापारी हैराणशहरा त विजेचे मेंटेनन्स वेळेवर केले जात नाही. वीज वाहक तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडाझुडपांची छाटणी केली जात नाही.

- साधा फ्यूज गेला तरी तो बसवण्यासाठी दोन-दोन तास वाट पाहावी लागते.
- महावितरणच्या या ढिसाळ आणि हलगर्जीपणामुळे परं ड्यातील सामान्य नागरिक, महिला, विद्यार्थी आणि विशेष तः व्यापारी वर्ग कमालीचा त्रस्त झाला आहे.
- दोन दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशाराम हासंघाने निवेदनात स्पष्ट केले आहे की, ग्राहकांच्या संम तीशिवाय कोणतेही स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नये.
- तसेच पुढील दोन दिवसांत शहरातील विजेचा लपंडाव पू र्णपणे बंद होऊन वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास, माहि ती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.
- या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची सर्व ज बाबदारी महावितरण प्रशासन आणि तहसील प्रशासनाची राहील, असा थेट इशाराही देण्यात आला आहे.

- या निवेदनावर फारूक शेख, कानिफनाथ सरपने, फारूक मुलानी,अमित आगरकर, विजय मेहर, धनंजय गोफणे, ज मीर शिकलकर,आलिम शिकलकर, असलम पल्ला, शिवा जी करळे, किशोर येवारे, कुलदीप देशमुख, संदीप शिंदे, रावसाहेब खरसडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्ष ऱ्या आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






