परंड्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; ६० हजारांच्या अंमली गोळ्यांसह एकाला अटक.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा येथे छत्रपती संभाजीनगर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (ANTF ) परंडा शहरात एक मोठी कारवाई केली आहे.
  • शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे सापळा रचून नशेच्या गोळ्यांची अवैध विक्री करणाऱ्या एका सराईत इसमाला अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली आहे.
  • त्याच्याकडून एकूण ५७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल ज प्त करण्यात आला आहे. शाहिद सादिक शेख (वय ३९ वर्षे, रा.परंडा, जि.धाराशीव) असे अटक करण्यात आले ल्या आरोपीचे नाव आहे.
  • याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून कारवाईअंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, छत्रपती संभाजीनगर यांना गुप्त बात मीदाराकडून परंडा शहरात अंमली गोळ्यांची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.
  • या माहितीच्या आधारे टास्क फोर्सच्या पथकाने दोन पंच आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) निरीक्षकांना सोबत घेऊन १५ जून २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाज ण्याच्या सुमारास परंडा येथील शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे छापा टाकला.
  • अंगझडतीत सापडल्या घातक अंमली गोळ्यापथकाने सं शयित शाहिद शेख याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली.
  • यावेळी त्याच्याकडे मानवी शरीराला घातक असणाऱ्या आणि नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या खालील गोळ्या व साहित्य मिळून आले:
  • Niteor-10 (Nitrozepam घटक असलेल्या): १५ गो ळ्या (किंमत रु. ६,०००)Nizascen-10 (Nitrozepa m घटक असलेल्या): १० गोळ्या (किंमत रु. ४,०००) A nzilum 0.5 (Alprazolam घटक असलेल्या): ९३ गो ळ्या (किंमत रु. ३१,३००)विवो कंपनीचा मोबाईल फोन: १ (किंमत रु. ३१,२००)आरोपीकडे कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय एकूण ५७,२०० रुपये किमतीचा मुद्देमाल विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला आढळून आला.
  • अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी हा सर्व मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त केला.
  • गुन्हा दाखल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनजप्त मु द्देमालासह आरोपीला परंडा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
  • त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे सहाय्यक फौ जदार वाहेद मुल्ला यांच्या फिर्यादीवरून आरोपी शा हिद शेख याच्याविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि स्टर नंबर ३९०/२०२६ नुसार एनडीपीएस कायदा (NDP S Act) कलम ८(C), २२(A) सह औषधी व सौंदर्य प्रसा धने कायदा कलम १८(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • सदर धडक कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स च्या पोलीस महानिरीक्षक श्रीमती ज्योतीप्रिया सिंह मॅडम, पोलीस अधीक्षक श्री.अजित टिके साहेब, आणि डी.वाय. एस.पी.श्री.साईनाथ ठोबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
  • कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीमती गीता बागवडे, पोली स उप-निरीक्षक प्रदीप ठाकूर, सपोउपनि वाहेद मुल्ला, ह नुमान पुरके, पोलीस हवालदार सुरेश राऊत, नागेश केंद्रे, निलेश सरपाळे, हरीशचंद्र मुंढे आणि ज्योती कीर्तीकर यां नी महत्त्वाची भूमिका बजावली.
  • या कारवाईमुळे परंडा शहर व परिसरातील अंमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles