
मोहोळ वनपरिक्षेत्र अंतर्गत अळजापूर येथील ७ हेक्टर राखीव वनक्षेत्रावरील अतिक्रमण हटवले; १९ जणांना न्यायालयीन कोठडी.
- प्रतिनीधी : भारत साळुंके :- सोलापूर(स्मार्ट सोलापूरक र डिजिटल मीडिया) : मोहोळ वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अंतर्गत येत असलेल्या मौजे आळजापूर (ता.करमाळा) येथील राखीव वन क्षेत्रात वनविभागाने एक अत्यंत मोठी आणि धडक अतिक्रमण विरोधी कारवाई पार पाडली आहे.
- येथील राखीव वन गट क्रमांक १७६, १७७, १७८, १७९ व १८२ मधील सुमारे ७ हेक्टर (१७ पेक्षा जास्त एकर) शास कीय वन जमिनीवर करण्यात आलेले अनधिकृत अतिक्र मण वनविभागाने पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या सं युक्त मदतीने पूर्णपणे हटवून जमीन मोकळी केली आहे.

- २० झोपड्या जमीनदोस्त; १९ जणांना अटक
- मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, सदर राखीव वन क्षे त्रावर पारधी समाजातील काही व्यक्तींनी बेकायदेशीर रित्या ताबा मिळवून त्या ठिकाणी २० झोपड्या उभारल्या होत्या.
- या संदर्भात वनविभागाने पूर्वतयारी करून अत्यंत गुप्तते ने व कडक पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवली.
- कारवाई दरम्यान शासकीय वन जमिनीवर अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या सर्व २० झोपड्या पाडण्यात आल्या.
- वन जमिनीवर बेकायदेशीररित्या अनधिकृत अतिक्रमण केल्याप्रकरणी घटनास्थळावरून १५ पुरुष आणि ४ महि ला अशा एकूण १९ व्यक्तींना वनविभागाने ताब्यात घेऊन अटक केली.
- अटकेनंतर सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने गुन्याचे गांभीर्य विचारात घेऊन सर्व १९ आरोपींना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाव ली आहे.
- या प्रकरणी वनरक्षक श्रीमती आयेशा पाशामियाँ शेख यां च्या फिर्यादीवरून मोहोळ वनपरिक्षेत्र कार्यालयात रॅ.गु.नं. ०५/२०२६ नुसार रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
- वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त फौजफाटा
- सदरची धडक कारवाई पुणे विभागाचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे व सोलापूरचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह यांच्या थेट मार्गदर्शनाखाली व नियोजनानुसार पार पडली.
- प्रत्यक्ष घटनास्थळावर सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे (EGS) व श्रीमती ऐश्वर्या शिंदे (CAMPA) यांनी मोहिमेचे नेतृत्व केले. वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO): श्री.योगेश घो डके (मोहोळ), श्री.राजू आटोले (माळशिरस), श्री.रोहित गांगुर्डे (सोलापूर) आणि श्रीमती शीला बडे (बार्शी) यांच्या सह सोलापूर वनविभागातील सर्व वनपाल, वनरक्षक व वनमजूर असे मिळून ७५ ते ८० वन कर्मचारी आणि का यदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाचे २० पोलीस कर्मचारी या मोहिमेत तैनात होते.
- पोलीस, महसूल आणि वनविभागाच्या या संयुक्त आणि कडक कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्यातील शासकीय व राखीव वन जमिनींवर डोळा ठेवणाऱ्या भूमाफियांमध्ये आणि अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
- आगामी काळातही राखीव वनांचे रक्षण करण्यासाठी अशाच प्रकारे तीव्र कारवाया केल्या जातील, असा स्पष्ट इशारा वनविभागाने दिला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






