प्रतापपूरच्या प्रणव गांगुर्डेचे MHT-CET मध्ये 99.42 पर्सेंटाइलसह घवघवीत यश

  • प्रतिनीधी : हर्षल ठाकरे :- प्रतापपूर येथील कु.प्रणव प्रशांत गांगुर्डे याने MAH-MHT CET (PCM Group) 2026 परीक्षेत तब्बल 99.4197952 पर्सेंटाइल(99.42 पर्सेंटाइल) मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
  • या यशामुळे प्रतापपूर गावाचे नाव तालुका व जिल्हा पात ळीवर उज्ज्वल झाले आहे.
  • प्रणव हा कासारे येथील खान्देश गांधी बाळूभाई मेहता मा ध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी असून त्याने इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण याच विद्यालयात पूर्ण केले आहे.
  • अत्यंत साधारण कुटुंबातून आलेल्या प्रणवने कोणत्याही खासगी क्लासचा आधार न घेता केवळ नियमित शिक्षण, स्वयंअध्ययन, कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले आहे.
  • MHT-CET परीक्षेत प्रणवने भौतिकशास्त्र (Physics) मध्ये 99.3481 पर्सेंटाइल, रसायनशास्त्र (Chemistry) मध्ये 96.8737 पर्सेंटाइल आणि गणित (Mathemati cs) मध्ये 99.6109 पर्सेंटाइल मिळवले आहेत.
  • त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे कुटुंबासह संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • विशेष म्हणजे प्रतापपूर गावाच्या इतिहासात JEE आणि MHT-CET सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये एवढे उल्लेखनीय यश मिळवणारा प्रणव हा पहिलाच विद्यार्थी ठरला आहे. त्यामुळे गावकऱ्यांकडून त्याचे विशेष कौतुक होत आहे.
  • प्रणवच्या या यशामागे त्याचे आई-वडील यांचे कष्ट आणि प्रोत्साहन तर आहेच, परंतु त्याच्या आजोबांची कडक शि स्त, शिक्षणाबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन आणि अभ्या साला दिलेले प्राधान्य यांचाही मोठा वाटा असल्याचे ग्राम स्थांनी सांगितले.
  • आजोबांच्या संस्कारांमुळे आणि मार्गदर्शनामुळे प्रणवला सातत्याने प्रेरणा मिळत गेली आणि त्यातूनच तो यशाचे हे शिखर गाठू शकला.
  • प्रणवच्या या यशाबद्दल कासारे एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, संचालक मंडळ, विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
  • तसेच प्रतापपूर गावाचे माजी सरपंच श्री धनराज गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री हर्षल ठाक रे, श्री सुरेश गांगुर्डे, श्री पराग गांगुर्डे तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांनी प्रणव व त्याच्या कुटुंबियांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
  • प्रणवच्या या यशामुळे प्रतापपूर गावातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण झाला असून, जिद्द, मेहनत आणि स्व यंअध्ययनाच्या जोरावर कोणतेही यश प्राप्त करता येते, हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles