
करमाळ्याच्या भूमीअभिलेख कार्यालयाच्या उपाधीक्षक यांना विना मूल्य माहिती देण्याचे खंडपीठाचे आदेश : ह्यूमन राईटचे अध्यक्ष आयुब शेख यांनी केली होती मागणी.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-करमाळा भूमी अभि लेख कार्यालयातील उपाधीक्षक यांना माहिती देण्याचे मा हिती आयुक्त खंडपीठाने आदेश दिले असून गेल्या दोन व र्षापासून ह्युमन राईट चे अध्यक्ष आयुब शेख यांनी उभार लेल्या लढ्याला यश आले आहे.
- आयुब शेख यांनी करमाळ्यातील भूमी अभिलेख कार्याल यामध्ये वर्षभरात बँकेचा बोजा चढवणे उतरवणे संदर्भात तारखेसह माहिती मागितली होती.
- यावर अनेक वेळा मागणी करून भूमीले भूमी अभिलेख कार्यालयाने टाळाटाळ करून ही माहिती देण्याचे टाळले होते.

- त्यामुळे नावेला जाणे अध्यक्ष आयुब शेख यांनी प्रथम भू मी अभिलेख करमाळा या कार्यालयात दिनांक १९ जाने वारी २४ रोजी माहितीचे अधिकारात अर्ज केला होता.
- सदर अर्जाची मुदत संपूनही माहिती अधिकार २००५ अ न्वये माहिती दिली नाही.
- त्यामुळे त्यांनी प्रथम अपिल उपाधीक्षक अभिलेख कार्या लय करमाळा यांच्याकडे दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोजी दाखल केले होते.
- त्या अपीलावर दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी सुनावणी करमाळा भूमी अभिलेख कार्यालयात झाली.
- यावेळी अपिलीय अधिकारी यांनी जन माहिती अधिका ऱ्याला पंधरा दिवसात माहिती देण्याचा आदेश दिला होता.
- तरी देखील माहिती न देता या आदेशाला केराची टोपली दाखवली होती.
- जन माहिती अधिकारी यांनी माहिती न दिल्यामुळे अखेर आयुब शेख यांनी १३ मे २०२४ रोजी आयुक्त , राज्य मा हिती आयुक्त खंडपीठ पुणे यांच्याकडे दाद मागितली होती.
- त्यामुळे माहिती आयुक्त खंडपीठ यांनी सुनावणीची तारी ख निश्चित करून दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी पुणे खंडपीठ येथे सुनावणी घेण्यात आली.
- यावेळी अपीलकर्त्यांनी मागितलेली माहिती बाबत प्रथम अपिलीय अधिकारी उपाधीक्षक करमाळा, जन माहिती अधिकारी व अपीलकर्ता या तीघांचे खंडपीठाने म्हणणे ऐकून घेतले.
- सर्व कागदपत्राची तपासणी करून खंडपीठ पुणे यांनी मा हिती अधिकार २००५ अन्वये मागितलेली सर्व माहिती खंडपीठाचा आदेश झाले पासून ३० दिवसाच्या आत अ पील कर्त्याला विनामूल्य पुरवावी असा आदेश केलेला आहे.
- त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयातील सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे.
- भूमी अभिलेख कार्यालयातील कारभाराबाबत संपूर्ण ता लुक्यामध्ये तीव्र नाराजी असून याबाबत वरिष्ठाने याची गं भीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी आयुब शेख यांनी केलेली आहे.
- चौकट
- माहितीचे अधिकारामधून मागणी केलेल्या अर्जाला दोन वर्षानंतर यश मिळाले असले तरी यामध्ये माहिती देण्या च्या आदेश केलेले आहेत.
- परंतु माहिती देण्यास विलंब केल्याबद्दल दंडात्मक कारवा ईची अपेक्षा होती, ती झालेली नाही. याबाबत पुढचा लढा आपण लढणार आहे .
- माहिती दडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चाप बसणे गरजे चे आहे.
- आयुब शेख, अध्यक्ष, ह्युमन राईट करमाळा.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






