
कोमल वाईन्ससमोरून महिलांना जाण्यास भाग पाडणारे प्रशासन; बॅरिकेट हटवा, अन्यथा आंदोलन – मारुती जाधव
- प्रतिनीधी : पिंपरी-चिंचवड : नामदेव मेहेर :- शरदनग र, कोयनानगर, शिवाजी पार्क, फुलेनगर, जिजामाता पार्क व घरकुल परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पु न्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

- स्पाईन रोडलगत असलेला पर्यायी मार्ग प्रशासनाने लोखं डी बॅरिकेट लावून बंद केल्यामुळे हजारो नागरिकांना कृ ष्णानगर चौकातील कोमल वाईन्ससमोरून ये-जा करावी लागत आहे.
- या मार्गावर महिला, विद्यार्थिनी आणि ज्येष्ठ नागरिक मो ठ्या प्रमाणात प्रवास करतात. वाईन शॉप परिसरात मद्य पींचा वावर असल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

- यापूर्वी हा पर्यायी मार्ग खुला असल्यामुळे नागरिकांना सुर क्षितपणे ये-जा करता येत होती.
- मात्र प्रशासनाने कोणत्याही जनसुनावणीशिवाय पुन्हा मा र्ग बंद केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
- या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव यांनी महानगरपालिका प्रशासन, वाहतूक पोलीस आणि चिखली पोलीस स्टेशन यांना निवेदन देत बॅरिकेट तात्काळ हटविण्याची मागणी केली आहे.

- “नागरिकांच्या सुरक्षिततेपेक्षा बॅरिकेट महत्त्वाचे का? महि ला आणि ज्येष्ठ नागरिकांनी नेमके कोणत्या मार्गाने जावे याचे उत्तर प्रशासनाने द्यावे.
- आठ दिवसांत रस्ता खुला न झाल्यास लोकशाही मार्गाने बॅरिकेट हटवा आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा जाधव यांनी दिला आहे.

- स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पर्यायी मार्ग पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी केली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






