बालसंगोपन योजनेचा लाभ घ्या.. हक्क सोडू नका.. शिक्षणाच्या बाबतीत आधार सामाजिक संस्था तुम्हाला आधार देईल- जुल्फीकार काझी.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-क्रांतीज्योती सावित्री बाई फुले बालसंगोपन योजना व विविध स्कॉलरशिपचे लाभ घेऊन आपली आर्थिक गरज भागवा, बालसंगोपन योजना हा एकल किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बाल कांची हक्काची योजना आहे.
  • ती मिळवून देण्यासाठी परंडा शहरातील एकल महिला व अनाथ मुलासाठी काम कारणारी आधार सामाजिक सं स्था नक्कीच तुमच्या मदतीसाठी सदैव तयार आहे.
  • असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष जुल्फीकार काझी यांनी शैक्षणिक साहित्य वाटपावेळी केले.
  • आधार सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या ही दि. 19 रोजी नगर परिषदेच्या गोपीनाथराव मुंडे सभागृहा त 100 पेक्षा जास्त अनाथ व एकल पालक विद्यार्थ्यांना अल्पोआहार देऊन शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
  • यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण विभा गाचे प्रतिनिधी संतोष जाधव, जेष्ठ समाजसेवक भारत घोगरे,सामाजिक कार्यकर्ते हाजी वाहेद सौदागर, तनवीर मुजावर,संस्थेच्या सचिव उर्मिला गरड,युवा कार्यकर्ते कुणा ल जाधव, सोहेल काझी, अय्याज पटेल,जियान काझी, कृ ष्णकांत पालके, विद्यार्थी व त्यांच्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे ते तुम्ही घ्या कोणत्याही वि द्यार्थ्यांना कोणतीही शैक्षणिक समस्या असल्यास आधार सामाजिक संस्थेशी संपर्क करा ते नक्कीच तुम्हाला मदत करतील असे हाजी वाहेद सौदागर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले.
  • संस्था तर अनेक आहेत पण विविध उपक्रम राबविणारी विशेषतः अनाथ विद्यार्थ्यांना व एकल महिला मदत कार णारी एकमेव आधार सामाजिक संस्था ही आहे.
  • संस्थेचे अध्यक्ष जुल्फीकार काझी हे एकल महिला व मुला साठी अहोरात्र काम करतात या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक प्रगती साधावी असे मत जेष्ठ समाजसेवक भारत घोगरे यांनी व्यक्त केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles