कूभेफळ ग्रामपंचायत चे शिपाई ( क्रमच्यारी )फैयाज बाबू शेख झाला पोलिस.

  • प्रतिनीधी : फारुख शेख :-जिद्द,चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर माणूस कोणतेही शिखर सर करू शकतो, हे कुं भेफळ येथील फैयाज बाबू शेख याने दाखवून दिले आहे.
  • अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फैयाजने पोलीस होण्याचे आपले स्वप्न साकार केले असून, त्याच्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
  • कुटुंबाचा खडतर प्रवास फैयाजचे मूळ गाव कुंभेफळ असू न त्याचे कुटुंब अत्यंत गरीब आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याचे आई रबाना शेख -वडील बाबू शेख, भाऊ जिशान शेख, आरबाज शेख आणि दोन भाऊ पुणे येथे स्थलांतरित झाले.
  • तेथे वडील बाबू शेख हे वॉचमन म्हणून काम करतात, तर आई दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करून कुटुंबाला हातभा र लावते.
  • भावानेही बिगारी काम करून फैयाजच्या शिक्षणाला आ णि स्वप्नांना बळ दिले.
  • चुलत्याची मोलाची साथगावची ओढ आणि पोलीस हो ण्याचे स्वप्न उराशी बाळगून फैयाज गावातच त्याचे चुलते दस्तगीर दगडू शेख आणि चुलती मूना दस्तगीर शेख यांच्याकडे राहत होता.
  • चुलत्याला स्वतःचे मूल नसल्यामुळे त्यांनी फैयाजला पोट च्या मुलासारखे सांभाळले. “फैयाज माझ्या मुलासारखा आहे, त्याला मी सांभाळेन,” हा शब्द चुलत्याने शेवटपर्यंत पाळला आणि त्याला पावलोपावलो मोलाची साथ दिली.
  • ग्रामपंचायत शिपाई ते पोलीस अधिकारीफैयाजने गावात राहून कुंभेफळ ग्रामपंचायतीमध्ये शिपाई (कर्मचारी) म्हणू न नोकरी पत्करली.
  • घरात अठराविश्व दारिद्र्य असतानाही, नोकरी सांभाळून त्याने पोलीस भरती अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला.
  • दिवसभर कामाचा व्याप आणि रात्री अभ्यासाचा व मैदा नी चाचणीचा सराव अशा खडतर दिनक्रमातून त्याने आपला सराव सुरू ठेवला.
  • स्वप्न झाले साकारअखेर फैयाजच्या जिद्दीला आणि संपूर्ण कुटुंबाच्या कष्टाला यश आले आहे.
  • फैयाजची पोलीस दलात निवड झाली असून, त्याने आप ले आई-वडील, भाऊ आणि चुलत्या-चुलतीचे स्वप्न पूर्ण केले आहे.
  • एका बिगारी काम करणाऱ्या आणि शिपायाचे काम कर णाऱ्या तरुणाने थेट पोलीस वर्दी परिधान केल्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांसमोर एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.
  • फैयाजच्या या यशाबद्दल कुंभेफळ गावासह संपूर्ण तालु क्यातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles