
वयाच्या १९ व्या वर्षी मुंबई पोलीसात भरती झालेल्या कु. समीक्षा जयराम बेर्डे हिचा दवंडेवाडी तर्फे नागरी सत्कार सोहळा संपन्न.
- प्रतिनिधी : दापोली : प्रमोद तरळ :- रविवार दि. १४ जून २०२६ रोजी नवतरुण सेवा मंडळ कोळबांद्रे दवंडेवा डी व आदर्श महिला मंडळ दवंडेवाडी तर्फे मुंबई पोलीस दलामध्ये नियुक्ती झालेल्या कु.समीक्षा जयराम बेर्डे हिचा जाहीर सत्कार करण्यात आला.
- कष्टकरी घरात जन्माला आलेल्या आणि प्रचंड मेहनतीने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी मिळविलेले यश म्हणजे मुंब ई पोलीस दलात तीची झालेली नियुक्ती.

- खरे तर हे यश कुटुंब आणि वाडी बरोबरच संपूर्ण गावाचे नाव उंचविणारे आहे आणि या यशाचा गौरव म्हणून मंड ळाच्या वतीने शाल, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मा नित करण्यात आले.
- तसेच या वेळी दिवा शहरातील कुणबी समाजातर्फे सुद्धा समीक्षाला सन्मानित करण्यात आले. यावेळी तिला पुढी ल वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
- यावेळी महिला मंडळाकडून केक कापून समीक्षाचा आनं द द्विगुणित करण्यात आला.
- यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. रामचंद्र दाजी खळे, सचिव मंगेश रामचंद्र दवंडे, खजिनदार वसंत नारायण दवंडे, महि ला मंडळ संघटिका अर्चना खळे, अध्यक्षा वर्षा खळे, कुण बी संघटनेचे बबन सकपाळ, सुनील आग्रे, नितीन लोखंडे, दिलीप शिगवण, राजेश चिनकटे त्याचबरोबर गणेश दवं डे, दिनेश दवंडे, रामचंद्र बेर्डे, राजेश बेर्डे, नितीन दवंडे, यश वंत खळे, गंगाराम खळे, शैलेश दवंडे, विश्वास दवंडे, महेंद्र दवंडे, संजय दवंडे, सतिश खळे, अक्षय बेर्डे, संदेश दवंडे आणि योगिता जयराम बेर्डे, स्मिता वसंत दवंडे, श्रृती यशवंत खळे, साक्षी राजेश बेर्डे, प्राची गणेश दवंडे, सान्वी सतिश खळे उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






