वडद हसोळची सुकन्या ‘फिजा मुकादम’ हिचा फॉरेन्सिक सायन्समध्ये सुवर्णवेध ; माध्यमिक विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थिनीचे दैदिप्यमान यश. 

  • प्रतिनिधी : प्रमोद तरळ :- “वादळे येतात उद्ध्वस्त करा यला नव्हे, तर तुमच्यातील ताकद पाहायला.” हे ब्रीदवाक्य कोकणातील एका छोट्याशा खेड्यातील मुलीने खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवले आहे.
  • प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वडद हसोळ गावची ला डकी लेक आणि ‘माध्यमिक विद्या मंदिर वडद हसोळ’ची माजी विद्यार्थिनी फिजा मुकादम हिने ‘फॉरेन्सिक सायन्स’ (Forensic Science) मध्ये ‘गोल्ड मेडल’ (सुवर्णपदक) पटकावून एक नवा इतिहास रचला आहे.
  • तिच्या या घवघवीत यशामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणाचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
  • फिजाचा हा प्रवास सोपा नव्हता. पाठीवर वडिलांचे छत्र नसताना, घरची परिस्थिती अत्यंत कठीण असतानाही ति ने डोळ्यातील स्वप्ने आणि उराशी असलेली जिद्द कधीही कमी होऊ दिली नाही.
  • माध्यमिक विद्या मंदिर वडद हसोळ या शाळेतून आपल्या शिक्षणाचा भक्कम पाया रचल्यानंतर तिने उच्च शिक्षणा साठी थेट नागपूर ते अमरावती अशा अनोळखी शहरांची वाट धरली.
  • आपल्या मातीपासून दूर, हॉस्टेलच्या चार भिंतीत राहून, प्रत्येक संकटाशी दोन हात करत तिने हे दैदिप्यमान यश संपादन केले आहे.
  • फिजाच्या या यशात तिच्या आईचा वाटा अत्यंत मोलाचा आहे, जिने वडिलांची उणीव कधीही भासू दिली नाही आ णि सावलीसारखी पाठीशी उभी राहिली.
  • सोबतीला मामांचे खंबीर पाठबळ लाभल्यामुळे फिजाच्या पंखांना उंच भरारी घेण्याचे बळ मिळाले.
  • हा केवळ फिजाचा सत्कार किंवा कौतुक नाही, तर वडद हसोळ आणि आसपासच्या ग्रामीण भागातील प्रत्येक मु लीसाठी हा एक मोठा प्रेरणादायी संदेश आहे.
  • गाव छोटे असले तरी स्वप्ने मोठी असू शकतात आणि परि स्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी कष्टाच्या जोरावर आभाळाला गवसणी घालता येते हेच फिजाने दाखवून दिले आहे.
  • वडदहसोळच्या या सुकन्येने माध्यमिक विद्या मंदिर वडद हसोळ या आपल्या मातृसंस्थेचा आणि गावाचा गौरव देशपातळीवर वाढवला आहे.
  • गावातील इतर मुलींनीही फिजाच्या या संघर्षातून आणि यशातून प्रेरणा घेऊन आपली स्वप्ने पूर्ण करावीत.‌ हीच ति ने केलेल्या कष्टाला खरी पावती ठरेल.
  • लवकरच ती फॉरेन्सिक सायन्सच्या माध्यमातून देशसेवा आणि मराठी जनतेची सेवा करण्यासाठी सज्ज होत आहे, ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची आणि डोळ्या त आनंदाश्रू आणणारी गोष्ट आहे.
  • फिजाच्या या अपार कष्टाला, त्यागाला आणि संघर्षाला सं पूर्ण वडद हसोळ ग्रामस्थ, माध्यमिक विद्या मंदिर शाळा परिवार आणि मराठी जनतेकडून मानाचा मुजरा…!
  • तिच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रत्येक यश स्वी पाऊलासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! फिजा, तु झा आम्हांला सार्थ आणि सार्थ अभिमान आहे…!
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles