
शिरवली शाळेत शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा.
- प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- जि.प. पु. प्रा. शाळा शिरवली येथे दि. १५ जून २०२६ रोजी ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
- इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या मुलांचे शाळेतील पहिले पाऊल त्यांचे औक्षण करून, पायांचे ठसे घेण्यात आले. पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
- कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रवेश दिंडी काढण्यात आली. नवागत मुलांना वाजत गाजत शाळेत आणण्यात आले. नवागतांचे औक्षण करून, पायांचे ठसे घेण्यात आले.

- दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नवागतांचे गुलाब पुष्प, खाऊ देवून स्वाग त करण्यात आले . याप्रसंगी शिक्षणाची गुढी उभारण्यात आली.
- मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते मुलांना मोफत पाठ्यपुस्तक, ग णवेश वाटप करण्यात आले. प्रति वर्षाप्रमाणे सामाजिक कार्यकर्त्या सौ.कविता बोरकर मॅडम यांच्याकडून शाळा व अंगणवाडीतील सर्व मुलांना खाऊ व रेनकोटचे वाटप करण्यात आले. यासाठी युवक मंडळ शिरवलीचे अध्यक्ष श्री.विजय कुळये यांनी प्रयत्न केले.
- ग्रामपंचायत सदस्य श्री संदीप गोबरे यांनी मुलांनी गुणव त्तापूर्ण शिक्षण घेऊन शाळा, गावाचे नाव उज्वल करावे असे सांगितले.
- माजी जि.प.अध्यक्ष मान.श्री.जगदीशजी राजापकर यांनी शाळेच्या भौतिक गरजा, समस्या सोडवण्यासाठी निश्चित पणाने प्रयत्न करेन असे सांगितले.
- सदर कार्यक्रमाला मान.श्री.जगदीशजी राजापकर माजी जि.प.अध्यक्ष, मान.श्री.गोपीनाथ कुळये, उपसरपंच शिर वली, श्री.संदीप गोबरे, सौ.आश्लेषा गोबरे, सौ.सुवर्णा मोर्ये सर्व ग्रा.पं.सदस्य शिरवली,पोलीस पाटील श्री.प्रकाश रा जापकर, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.रमेश राजापकर,माजी वि द्यार्थी संघ अध्यक्ष मा.श्री.गोविंद सुद,श्री.प्रसन्न राजापकर, श्री.गोतावडे सर मुख्या.सौ.दळवी मॅडम उपशिक्षिका, सौ. रश्मी राजापकर अंगणवाडी ताई,पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






