इसवली येथील पाथरवाडीतील सार्वजनिक विहिरीत पडलेल्या बिबट्याचा दोरीच्या सहाय्याने जिवदान.

  • प्रतिनिधी : लांजा : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौजे इसवली गावातील पाथरवाडीतील सार्वजनिक विहिरीत दि. २१ जून २०२६ रोजी बिबटया हा वन्य प्राणी पडलेला असल्याची माहिती सकाळी ११ वाजून ४० वाजण्याच्या सुमारास इसवली गावचे ग्रामस्थ श्री अक्षय गुरव यांनी वनविभागाला दिली.
  • त्याप्रमाणे तात्काळ परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांना सदरची माहिती देऊन लांजा वनपरीमंडळाचे अधिकारी स्टाफसह तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
  • सदर बिबट्याला विहिरीमध्ये दोरीच्या सहाय्याने लोखंडी पिंजरा सोडून सुरक्षित पिंजऱ्यामध्ये घेतले व सहायक आ युक्त पशुवैद्यकीय अधिकारी लांजा डॉ.सुहास अनुसे यां च्याकडून वैद्यकीय तपासणी करून घेतली.
  • सदर बिबट्या हा नर जातीचा असून त्याचे वय हे अंदाजे दीड वर्ष आहे. त्यानंतर सदर बिबट्याला तो सुस्थितीत अ सल्याने नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
  • सदरची कार्यवाही माननीय विभागीय वन अधिकारी रत्ना गिरी (चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी श्री.विक्रम गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्या त आली.
  • सदर कार्यवाहीसाठी श्री धुळू कोळेकर वनपाल लांजा, श्री मती नमिता कांबळे वनरक्षक लांजा, श्रीमती श्रावणी पवा र वनरक्षक कोर्ले तसेच रेस्क्यू टीम सदस्य श्री अमित लां जेकर व श्री सागर साळवी तसेच इसवली गावचे पोलीस पाटील श्री दत्ताराम आपणकर , सरपंच व सर्व ग्रामस्थ यांनी कार्यवाही पूर्ण केली.
  • अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडच णी सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9096578761 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन माननीय विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चि पळूण) श्रीमती गिरिजा देसाई यांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles