
परंडा पोलिसांचा डिजिटल मीडिया संघटनेकडून गौरव; गजानन मुळे व शेवाळे यांचा सत्कार.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-परंडा:येथील पोलीस ठा ण्याचे पोलीस अंमलदार गजानन मुळे यांची पोलीस उ पनिरीक्षक (PSI) पदी निवड झाल्याबद्दल आणि पोलीस अंमलदार शेवाळे यांची पोलीस हवालदार पदी पदोन्नती झाल्याबद्दल डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

- पोलीस विभागातील उल्लेखनीय कामगिरी आणि पदोन्न तीबद्दल दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

- या यशाचे औचित्य साधून तालुक्यातील पत्रकारांनी पोली स ठाण्यात जाऊन मुळे आणि शेवाळे यांना पुढील वाटचा लीस शुभेच्छा दिल्या.

- या सत्कार समारंभाप्रसंगी डिजिटल मीडिया संघटनेचे प दाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- यामध्ये नूरजहाँ शेख, फारूक शेख, विजय मेहेर, संतोष शिंदे, तानाजी घोडके, धनंजय गोफणे, रणजित शिंदे, समी र ओव्हाळ आणि अनुराग ठाकूर यांच्यासह इतर मान्यवरां चा समावेश होता.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






