खासदार संजय दिना पाटील यांच्याकडून पत्रकारांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी; परंडा तालुका पत्रकारांचा तीव्र निषेध व कारवाईची मागणी.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख ‌शेख :- परंडा लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना खासदार संजय दिना पाटील यांनी जाहीरपणे अत्यंत हीन दर्जाची शिवीगाळ क रत जीवे मारण्याची धमकी दिली.
  • या हुकूमशाही आणि बेजबाबदार वर्तनाचा परंडा तालु क्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने तीव्र शब्दांत जा हीर निषेध करण्यात आला आहे.
  • या प्रकरणी संबंधित खासदारांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या माग णीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
  • हे निवेदन मुख्यमंत्री, पोलीस अधीक्षक (धाराशिव), तहसी लदार (परंडा) आणि पोलीस निरीक्षक (परंडा) यांना पाठ वण्यात आले आहे.
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपीनिवेदनात म्हटले आहे की, पत्रकार अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत समाजात जन जागृती करण्याचे आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे पवि त्र काम करत असतात.
  • मात्र,एका जबाबदार लोकप्रतिनिधी पदावर असलेल्या व्य क्तीकडून असे हिंसक आणि असभ्य वर्तन घडणे अत्यंत संतापजनक आणि लोकशाहीच्या मूल्यांना काळिमा फास णारे आहे.
  • पत्रकारांवर होणारे असे हल्ले आणि धमक्या म्हणजे थेट अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न आहे.
  • या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. पत्रकारांच्या प्रमुख मागण्या : गुन्हा दाखल करा : पत्रकारां ना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी संबंधित खासदारांवर तात्काळ कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा.
  • कठोर कारवाई : महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
  • सुरक्षेची हमी: पत्रकारांना कोणत्याही दबावाशिवाय भय मुक्त वातावरणात काम करता यावे, यासाठी शासनाने व प्रशासनाने ठोस पावले उचलावीत.
  • तीव्र आंदोलनाचा इशाराप्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित दोषींवर तात्काळ कडक कारवाई करावी.
  • अन्यथा परंडा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव लोकशा ही मार्गाने तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा या निवेद नाद्वारे देण्यात आला आहे.
  • या निवेदनावर नूरझाहा शेख,सतोष शिंदे, तानाजि घोडके, फारूक शेख,विजय मेहेर,समिर ओव्हाळ, धनजय गोफने, रणजित शिंदे, आनुराग ठाकुर, इत्यादीच्या स्वाक्षऱ्या आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles