
परंडा येथे स्वतंत्र दिव्यांग प्रमाणपत्र बोर्ड सुरू; दिव्यांग उद्योग समूहाच्या पाठपुराव्याला अखेर यश.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आता दिव्यांग प्रमाणपत्रासाठी जिल्हा मुख्यालयाच्या चकरा माराव्या लागणार नाहीत.
- दिव्यांग उद्योग समूहाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखे र मोठे यश आले असून, परंडा येथे स्वतंत्र दिव्यांग प्रमाण पत्र बोर्ड मंजूर करण्यात आले आहे.
- या बोर्डाद्वारे उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथून दिव्यांग प्र माणपत्रांचे वितरणही अधिकृतपणे सुरू झाले आहे.
- यापूर्वी परंडा तालुक्यातील दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जिल्हा मुख्यालयात वारंवार फेऱ्या मारा व्या लागत होत्या.

- यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता.
- दिव्यांगांची ही गैरसोय दूर करण्यासाठी दिव्यांग उद्योग स मूहाचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष तानाजी घोडके यांनी मंत्रालय स्तर, जिल्हा प्रशासन आणि दिव्यांग कल्याण विभागाकडे सातत्याने लेखी पाठपुरावा केला होता.
- विविध स्तरांवर निवेदने देऊन त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेध ले. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून परंड्या तच स्वतंत्र बोर्ड कार्यरत झाले आहे.
- या सुविधेमुळे तालुक्यातील शेकडो दिव्यांग बांधवांना मो ठा दिलासा मिळाला असून सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे.
- ज्या दिव्यांग बांधवांचे प्रमाणपत्र अद्याप मिळालेले नाही, त्यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथे संपर्क सा धून आपले प्रमाणपत्र मिळवून घ्यावे, असे आवाहन ताना जी घोडके यांनी केले आहे.
- तसेच, दिव्यांग उद्योग समूह ही संघटना दिव्यांगांच्या ह क्कांसाठी आणि त्यांना शासनाच्या सर्व योजना मिळवून देण्यासाठी भविष्यातही सदैव कटिबद्ध राहील, असा वि श्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






