भोत्रा ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरण: संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश; तक्रारदाराचा उपोषणाचा इशारा.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- परंडा तालुक्यातील भोत्रा ग्रामपंचायत कार्यालयातील तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी आणि भ्रष्टाचाराशी संबंधित इतर व्यक्तींवर योग्य ती शासकीय कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.
  • या प्रकरणी कारवाई न झाल्यास तक्रारदाराने उपोषणाचा इशारा दिल्याने प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत.
  • भोत्रा (ता. परंडा) येथील रहिवासी दत्तात्रय सुभाष गोळे यांनी दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी धाराशिवच्या पालकमंत्री कार्यालयात यासंदर्भात निवेदन सादर केले होते.
  • तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी रोहिणी सातपुते व संबं धित इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्यावर फौज दारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती.
  • या निवेदनाची दखल न घेतल्यास उपोषणास बसण्याचा इशाराही गोळे यांनी दिला होता.
  • या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयातील उपचिटणीस शाखेचे तहसीलदार (महसू ल) प्रकाश व्हटकर यांनी दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना पत्र पाठ वले आहे.
  • या पत्रात संबंधित अर्जातील मुद्द्यांनुसार प्रचलित नियम, अधिनियम आणि शासन निर्णयानुसार तात्काळ आवश्य क ती कारवाई करून तक्रारदाराला अवगत करण्याचे निर्देश दिले आहेत.
  • तसेच, या प्रकरणाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई  कर ण्याची विनंती धाराशिव पोलीस अधीक्षकांना करण्यात आली आहे.
  • दरम्यान, प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेऊन संबं धित विभागांना कारवाईचे आदेश दिले असल्याने, तक्रार दार दत्तात्रय गोळे यांनी उपोषणासारख्या मार्गाचा अवलंब न करता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे पत्राद्वारे करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles