
मॉडर्न हायस्कूल निगडी येथे अमली पदार्थ विरोधी दिन उत्साहात साजरा.
- प्रतिनिधी : नामदेव मेहेर :-मॉडर्न हायस्कूल, निगडी येथे इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या शाळेत आंतरराष्ट्रीय अम ली पदार्थ विरोधी दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्या त आला.
- विद्यार्थ्यांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जन जागृती निर्माण करण्यासाठी शाळेच्या वतीने मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
- यावेळी शिक्षक शिवाजी अंबिके यांनी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक नुकसान याबाबत माहिती दिली.

- तसेच निरोगी जीवनशैली, चांगल्या सवयी आणि व्यसनां पासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला.
- विद्यार्थ्यांनी कुटुंबात आणि परिसरात व्यसनी व्यक्तींना व्य सनाचे दुष्परिणाम सांगून परावृत्त करावे असे सांगितले.
- कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये, पोस्टर व जनजागृती पर उपक्रमांद्वारे “व्यसनमुक्त समाज घडवूया” हा संदेश दिला.

- यावेळी विद्यार्थ्यांना अमली पदार्थांना नकार देण्याची शप थ दिली. शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पाबळे, इंग्रजी मा ध्यम मुख्याध्यापिका गौरी सावंत,संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ.गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख, सह कार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह प्रा.डॉ.नि वेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष रा.मानसिंग साळुं के,व्हिजिटर प्रमोद शिंदे,पर्यवेक्षक विजय पाचारणे, संस्था सदस्य राजीव कुटे यांनी कौतुक केले.

- कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक गंगाधर सोनवणे, मधुकर रासकर,अमोल नवलपुरे,आशा कुंजीर,सोनाली गावकर,वृषाली सलगरयांनी सहकार्य केले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूक ता वाढली.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






