ग्रामविकास मंडळ येळवणतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व शिक्षकांचा कृतज्ञता सोहळा संपन्न.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील येळ वण ग्रामविकास मंडळामार्फत नुकताच शालेय विद्यार्थ्यां चा गुणगौरव करून त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप क रण्यात आले.
  • कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष दिपक जाध व होते.
  • व्यासपीठावर येळवणच्या सरपंच सौ.दिपाली जाधव, जि ल्हा परिषद सदस्य प्रतिक मटकर, पंचायत समि ती सद स्य उमेश पराडकर, पोलीस पाटील शुभदा सकपाळ, शा ळा व्यवस्थापन समिती येळवण नं.१ अध्यक्षा सौ. सुगंधा बाईत, समितीचे उपाध्यक्ष अनंत साळवी आदी मा न्यवर उपस्थित होते.
  • येळवण हायस्कूलमध्ये अनेक वर्षे काम केलेल्या शिक्ष कां च्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व विद्यार्थ्यांना प्रो त्साहन मिळावे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष दिपक जाधव यांनी सांगितले.
  • यावर्षी पटसंख्येअभावी येळवण हायस्कूल शून्य शिक्षकी झाल्याने येथील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे तालुक्यातील इत र हायस्कूलमध्ये समायोजन करण्यात आले आहे.
  • गेली अनेक वर्षे येळवणमध्ये काम करणाऱ्या शिक्षिका सौ.श्वेता बाणे, शिक्षक गणेश बरडे, श्री.किरण पवार, कर्म चारी वृंद सौ.शैला गोरे, श्रीमती माधवी मसुरकर, लिपिक श्रीमती अनुजा पवार यांचा शाल श्रीफळ देऊन येथोचित गौरव करण्यात आला.
  • तसेच जिल्हा परिषद येळवण नं. १ चे शिक्षक श्री.विशाल घोलप यांची ओझरच्या केंद्र्प्रमुखपदी नियुक्ती झाल्याने त्यांचाही तसेच येळवण हायस्कूलचे माजी शिक्षक व सौं दळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक संभाजी केळुसकर यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
  • तसेच इयत्ता १० वीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळ विलेले विद्यार्थी कु. अनुष्का लाड ८३.८३ टक्के, मंथन आ यरे ६७.२० टक्के, पियुष तरळ ६३.६० टक्के यांचा विशेष भेटवस्तू व रोख बक्षिस देऊन गौरव करण्यात आला.
  • कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे उपाध्यक्ष अनंत साळवी यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.खल्ले सर यांनी केले.
  • या कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी अशोक चाळके, मो हन सकपाळ, अनंत मालप, विकास फाकांडे, विठोबा च व्हाण, सुभाष चव्हाण, मारुती आमटे, रविकांत शिर्के, अंग णवाडी सेविका रिया तरळ आदी मान्यवर मंडळी तसेच शाळेतील विध्यार्थी,महिला,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थि त होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles