पदवी घेऊन मुंबईला नाही, तर शेतात गेली राजापूरची धनश्री.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- दहावी-बारावी झा ल्यावर नोकरीसाठी मुंबई-पुण्याचा मार्ग धरणं ही आजची पद्धत झाली आहे.
  • पण राजापूर तालुक्यातील तळवडे गावच्या धनश्री शिवा जी रबसे यांनी या प्रवाहाविरुद्ध जाण्याचा निर्णय घेतला.
  • शेती पदवीधर झाल्यानंतर त्यांनी नोकरीच्या मागे न लाग ता वडिलोपार्जित जमिनीवर शेती करण्याचा निर्धार केला.
  • सुमारे पाच एकर क्षेत्रात धनश्री सध्या बारमाही भाजीपा ला लागवड करतात. पिकवलेला भाजीपाला विकण्यासा ठी त्या बाजारपेठेच्या मागे गेल्या नाहीत.
  • थेट रस्त्यालगत स्वतःचा स्टॉल उभा करून गावकऱ्यांना आणि प्रवाशांना ताज्या भाज्या विकायला सुरुवात केली.
  • यामुळे मध्यस्थ नको, ग्राहक थेट शेतकऱ्याकडून खरेदी करतो आणि शेतकऱ्यालाही योग्य भाव मिळतो.
  • या वाटचालीत आई- वडिलांचं सहकार्य धनश्रीला मोठं बळ देऊन गेलं. वडिलांच्या मदतीने त्यांनी शेतीकडे केवळ पारंपारिक काम म्हणून न पाहता, एक शास्त्रीय व्यवसाय म्हणून पाहायला सुरुवात केली.
  • शिक्षण घेऊनही शेतात राबणं आणि स्वतःच विक्रीची व्य वस्था करणं पसंत करणाऱ्या धनश्रीची ही वाटचाल आज च्या तरुण पिढीसाठी नवा आदर्श ठरू शकते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles