
सार्वजनिक सुनावणी शांततेत पार; सरपंचांच्या स्पष्ट भूमिकेची प्रशासनाकडे नोंद, निकालाकडे सर्वांचे लक्ष.
- प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- अप्पर तहसीलदा र कार्यालयाच्या मुख्यालयासंदर्भात उपविभागीय अधिका री कार्यालय, राजापूर येथे आयोजित करण्यात आलेली सार्वजनिक सुनावणी नियोजित वेळेनुसार व शांततापूर्ण वातावरणात पार पडली.
- सुनावणीदरम्यान विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, प्रतिनि धी आणि नागरिकांना आपापली भूमिका मांडण्याची सं धी देण्यात आली.
- हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही ग्रामपंचायतीं क डून दोन्ही प्रस्तावित ठिकाणांच्या समर्थनार्थ भूमिका नोंद विण्यात आल्याची बाब समोर आली होती.

- त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींची नेमकी व स्पष्ट भूमिका प्रशासनासमोर प्रत्यक्ष मांडली जावी, या उद्देशानेच ही सा र्वजनिक सुनावणी आयोजित करण्यात आली असावी, अ से मत सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या काही सरपंचां नी व्यक्त केले.
- सुनावणीदरम्यान प्रत्येक सरपंचाला स्वतंत्रपणे आपली भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली. तसेच, “आपल्या वर कोणत्याही प्रकारचा दबाव आहे का?”आणि“आपल्या ग्रामपंचायतीसाठी कोणते ठिकाण अधिक सोयीचे ठरे ल?” अशा स्वरूपाचे प्रश्नही प्रशासनाकडून विचारण्यात आल्याचे उपस्थितांनी सांगितले.
- त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीची भूमिका कोणत्याही संभ्र माशिवाय नोंदविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची चर्चा होती.
- सुनावणीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रांत कार्यालय परिसरात पोलिस बंदोब स्त तैनात करण्यात आला होता.संपूर्ण प्रक्रिया शांततापूर्ण आणि सुरक्षित वातावरणात पार पडली.
- यावेळी काही व्यक्तींनी वैयक्तिक मतभेदातून टिपण्या व टिप्पणी केल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती. मात्र, त्याचा सुनावणीच्या प्रक्रियेवर कोणताही परिणाम झाला नाही.
- एकूणच संपूर्ण सुनावणी खेळीमेळीच्या वातावरणात, नि योजनबद्ध पद्धतीने आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पूर्ण झाल्याचे मत काही उपस्थित प्रतिनिधींनी व्यक्त केले.
- सुनावणीत कोणत्या ग्रामपंचायतीने कोणती भूमिका मांड ली, याची अधिकृत माहिती प्रशासनाकडून पुढील प्रक्रिये नंतर स्पष्ट होणार आहे.
- दरम्यान, उपस्थितांमध्ये झालेल्या चर्चांवरून पाचलच्या स मर्थनाला अधिक लोकसमर्थन असल्याची भावना व्यक्त होत होती.
- आता सुनावणीत नोंदविण्यात आलेल्या भूमिका, हरकती आणि प्रशासकीय निकषांच्या आधारे प्रशासन कोणता नि र्णय घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






