कूभेफळ येथे राष्ट्रसंत श्री भगवानबाबा पालखीचे उत्साहात आगमन; ८ ते १० हजार वारकऱ्यांचा मुक्काम, सर्वधर्मीयांकडून सेवा.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- कूभेफळ ता परंडा येथील गावात राष्ट्रसंत श्री भगवानबाबा पालखी सोहळ्या चे दिनांक १९ जुलै २०२६ रोजी अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात आगमन झाले.
  • या वर्षी दिंडीचा मुक्काम कूभेफळ येथे असल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण होते. पालखीसोबत आलेल्या सुमारे ८ ते १० हजार वारकऱ्यांची राहण्याची, जेवणाची आणि इतर सर्व प्रकारची उत्तम व्यवस्था ग्रामस्थांच्या वती ने करण्यात आली होती.
  • पाऊस आणि आरोग्याची चोख व्यवस्थासध्या सुरू अस लेल्या पावसाच्या दिवसांचा विचार करून ग्रामस्थांनी वा रकऱ्यांसाठी वॉटरप्रूफ व सुरक्षित निवासाची (पावसाची) सोय केली होती.
  • तसेच, लांबच्या पायी प्रवासामुळे वारकऱ्यांच्या आरोग्या ची काळजी घेण्यासाठी विशेष डॉक्टरांची टीम आणि औ षधोपचारांची सोय गावामध्ये उपलब्ध करून देण्यात आ ली होती.
  • सर्वधर्मसमभावाचे ग्रामस्थांनी वाढले जेवण कूभेफळ गाव च्या वतीने सर्व वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे (जेवण) आ योजन करण्यात आले होते.
  • याप्रसंगी गावातील हिंदू, मुस्लिम व इतर सर्व धर्मीयांचे ल हान-थोर मंडळी एकत्र आले होते.
  • सर्वांनी मिळून वारकऱ्यांना अत्यंत आपुलकीने जेवण वा ढले आणि सेवेचा लाभ घेतला. तसेच, दुसऱ्या दिवशी स काळी सर्व वारकऱ्यांसाठी चहा-पाण्याची चोख सोय कर ण्यात आली होती.
  • प्रमुख ग्रामस्थांची उपस्थितीया सोहळ्याचे नियोजन आ णि वारकऱ्यांच्या सेवेमध्ये गावातील प्रमुख नागरिक राम दास मेंडे, बळीराम आव्हाळे, नाना कापसे, सोमनाथ भरा डे, सचिन राऊत, आप्पा कोटुळे, विठ्ठल तिपाले, रफीक शेख, कादर बेग, पोलीस पाटील आतिक काझी, आसिफ शेख, रहिमत शेख, राजू बेग, विनोद नायकोडे, गणेश नाय कोडे, अयुब शेख, ज्ञानेश्वर माउली, आप्पा नायकोडे, बापू कोटुळे, सादिक शेख, मुकरम शेख, गौस पठाण, सिद्दीक शेख, अकबर शेख, तसेच कापसे, नायकोडे, कोरे, गायक वाड, आव्हाळे, गावडे, जगदाळे, जाधव, सोनटक्के, हजारे, मुलानी, सय्यद, तिपाले, मेंडे, पटेल, आडगळे, कांबळे, रा ऊत, भरांडे, मुजावर आणि मोगल परिवारासह गावातील समस्त आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्वांच्या सामूहिक सहकार्यामुळे हा पालखी मुक्काम सोह ळा अत्यंत यशस्वी आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles