
ग्रामपंचायतच्या बोगस कामांविरोधात भोत्रा येथे माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे बेमुदत उपोषण; दुसऱ्या दिवशी विविध पदाधिकाऱ्यांनी घेतली भेटप्रशासनाने तात्काळ चौकशी न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा जाहीर इशारा.
- प्रतिनिधी : परंडा :फारूक शेख :-भोत्रा गावात प्रत्यक्षा त कोणतीही कामे न करता केवळ कागदोपत्री घोडे नाच वून ग्रामपंचायत मार्फत लाखो रुपयांची उचल करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत, भोत्रा (ता. परंडा) येथे माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
- या कथित बोगस कामांची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, या मुख्य माग णीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते देशमुख व गोळे हे आंदोलनाला बसले असून, आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस होता.

- जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून उपोषणस्थळी भेट आणि पा ठिंबाभोत्रा येथे सुरू असलेल्या या आंदोलनाची माहिती मिळताच माहिती अधिकार संघटनेच्या जिल्हास्तरीय व रिष्ठ पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी धाव घेतली.
- यामध्ये संघटनेचे जिल्हा अध्यक्ष फारूक शेख, विजय मे हेर, जमीर शिकलकर, धनंजय गोफने आणि भाऊ करळे आदींचा समावेश होता.
- या सर्व नेत्यांनी उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
- तसेच,ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराविरोधातील या लढ्या ला संघटनेचा जाहीर पाठिंबा घोषित केला.
- नागरिकांमध्ये तीव्र संताप; आंदोलनाचा इशाराभोत्रा ग्राम पंचायतीमध्ये झालेल्या या कथित भ्रष्टाचारामुळे आणि विकासकामांच्या नावाने झालेल्या लाखो रुपयांच्या गैर व्यवहारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
- “जनतेचा पैसा अशा प्रकारे बोगस कामांवर लाटला जात असेल, तर ते सहन केले जाणार नाही,” अशी भूमिका ग्रा मस्थांनी घेतली आहे.
- उपोषणस्थळी भेट दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर या बोगस कामांची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी व पदाधि काऱ्यांवर कडक कारवाई झाली नाही, तर आगामी काळा त हे आंदोलन संपूर्ण तालुका आणि जिल्हा पातळीवर अधिक तीव्र केले जाईल.
- या आंदोलनाकडे आता संपूर्ण परंडा तालुक्याचे लक्ष ला गले असून, प्रशासन यावर काय पावले उचलणार, याकडे सर्वांच्या लक्ष लागले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






