सालेगाव येथील तीव्र पाणी टंचाईचा प्रश्न पेटला; ३ ऑगस्टपासून ग्रामस्थांचे आमरण उपोषण!प्रशासनाच्या उदासीन कारभाराविरोधात ग्रामस्थांचा एल्गार; लोहारा तहसीलदारांना अंतिम पूर्वसूचना.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-सालेगाव लोहारा ता लुक्यातील सालेगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून पाश वी आणि तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
  • या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही को णतीही कारवाई न झाल्याने, सालेगावच्या संतप्त ग्रामस्थां नी येत्या ३ ऑगस्ट २०२६ पासून आमरण उपोषणाला ब सण्याचा इशारा दिला आहे.
  • या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने लोहारा येथील तहसीलदा र, पोलीस निरीक्षक आणि गटविकास अधिकारी (BDO) यांना अंतिम पूर्वसूचनेचे निवेदन सादर करण्यात आले आहे.
  • महिला व लहान मुलांचे पाण्यासाठी प्रचंड हालसालेगाव मध्ये सध्या पाशवी पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
  • गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. पाण्याचा दुसरा कोणताही पर्याय उप लब्ध नसल्याने महिला, लहान मुले आणि वृद्ध नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.
  • पिण्यासारख्या मूलभूत गरजेसाठीही ग्रामस्थांना वणवण करावी लागत असल्याने गावात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
  • १६ जुलैच्या निवेदनाची प्रशासनाकडून दखल नाहीयापूर्वी सालेगावच्या ग्रामस्थांनी १६ जुलै २०२६ रोजी प्रशासना ला रीतसर निवेदन देऊन तात्काळ टँकर सुरू करण्याची किंवा पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली होती.
  • त्या निवेदनात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला होता.
  • मात्र, प्रशासनाच्या उदासीन आणि हलगर्जी कारभारामुळे तब्बल दोन आठवडे उलटूनही गावाला एक थेंबही पाणी मिळाले नाही, की प्रशासनाने गावकऱ्यांची साधी दखलही घेतली नाही. तर जीवितहानीला प्रशासन जबाबदार राहील..! “पिण्याचे पाणी हा आमचा मूलभूत हक्क आहे.
  • प्रशासनाने आम्हाला वाऱ्यावर सोडल्यामुळे आता लोक शाही मार्गाने आंदोलन करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
  • येत्या ७ दिवसांत जर गावात ठोस उपाययोजना किंवा टँ कर सुरू झाला नाही, तर ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजल्यापासून सालेगाव ग्रामपंचायतीसमोर सर्व ग्रामस्थ आमरण उपोषणास बसणार आहेत.
  • या उपोषणादरम्यान कोणत्याही उपोषणकर्त्याच्या आरो ग्यास बरे-वाईट झाल्यास किंवा जीवितहानी झाल्यास,त्या ची सर्वस्वी जबाबदारी लोहारा / तालुका प्रशासन आणि संबंधित विभागाची राहील, असा थेट इशारा गावकऱ्यांनी या अंतिम नोटीसद्वारे दिला आहे.
  • या आंदोलनात सालेगावचे आबालवृद्ध आणि महिला मो ठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
  • यानिवेदनावर भिम पॅथर सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष संघर्ष राजेन्द्र भालेराव, शारदबाई दयानंद भालेराव, आशा बाई मसाजी भालेराव. उषाबाई केरणात भालेराव, अनिता बालाजी धनेराव, विमलबाई शंकर भालेराव, दगडू पंढरी भालेराव,हनुमंत लालू भालेराव. इत्यादींच्या साक्षर आहेत.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles