शेतकऱ्यांवर होणारा पीक विम्याचा अन्याय खपवून घेणार नाही….!आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांचा तहसीलदारांना फोन; तातडीने कार्यवाहीचे निर्देश.

  • प्रतिनीधी : परंडा: फारूक शेख :- भूम/परांडा/वाशी: खरीप २०२५ हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना, पीक विमा कंपन्यांनी जाहीर केलेल्या भरपाईत प्रचंड तफावत दिसून येत आहे.
  • भूम-परांडा-वाशी मतदारसंघातील बळीराजावर झालेला हा अन्याय अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतला आहे.
  • याप्रकरणी त्यांनी थेट वाशीच्या तहसीलदारांना फोन करू न विमा कंपन्यांकडून तात्काळ जाब विचारण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
  • याबाबत सविस्तर वृत्त असे की, यंदाच्या खरीप हंगामात मतदारसंघात अतोनात नुकसान झाले आहे. असे असतानाही पीक विमा वाटपात विमा कंपन्यांनी दुजाभाव केल्याचे समोर आले आहे.
  • शेजारच्या तालुक्यांमध्ये प्रति हेक्टर जवळपास २० हजार रुपयांपर्यंत पीक विमा मंजूर झाला आहे.
  • या उलट भूम-परांडा-वाशी मतदारसंघातील अनेक महसु ली मंडळांमध्ये मात्र केवळ ९००, २,७०० ते ३,५०० रुपयां ची किरकोळ मदत जाहीर झाली आहे.
  • विमा कंपन्यांनी लावलेला हा निकष अत्यंत अन्यायकार क आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा असल्या ने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
  • प्रशासनाला कडक सूचनाशेतकऱ्यांच्या या बिकट परिस्थि तीची गंभीर दखल घेत आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी वाशीच्या तहसीलदारांशी फोनवरून संपर्क साधला.
  • “नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची जास्तीत जास्त भरपाई मिळालीच पाहिजे. प्रशासनाने या प्रकरणा त वैयक्तिक पातळीवर लक्ष घालावे.
  • विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना तात्काळ बोलावून या तफा वतीचा जाब विचारावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी,” अशा स्पष्ट आणि कडक सूचना आमदार सावंत यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
  • आमदार साहेबांच्या या भूमिकेमुळे आता विमा कंपन्या आणि प्रशासकीय यंत्रणा काय पावले उचलणार, याकडे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles