
ओला, उबर, रॅपिडोच्या मनमानीला रिक्षाचालक कृती मधून उत्तर देणार पिंपरी-चिंचवड मेट्रो स्थानकांवर १५ ऑगस्टपासून ‘मीटरप्रमाणे रिक्षा’ सेवा सुरू….!
- प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- १. पिंपरी-चिंचवड मेट्रो स्था नकांवर आता ‘मीटरप्रमाणे रिक्षा’ धावणार; रिक्षाचालकां च्या आर्थिक शोषणाला बसणार चाप…!
- २. मीटर सक्तीची अंमलबजावणी करण्यासाठी पिंपरी RTO कडून विशेष पथक नेमणार; अशी माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे युवक अध्यक्ष शुभम तांदळे यांनी दिली !
- ३. कष्टकऱ्यांचे नेते डॉ.बाबा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखा ली ऐतिहासिक निर्णय; १५ ऑगस्टपासून पिंपरी-चिंचवड मध्ये मीटरनेच रिक्षा व्यवसाय…!

- पिंपरी-चिंचवड, ३० जुलै २०२६ :
- ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या भांडवलदार कंपन्यां च्या मनमानीला चाप बसवण्यासाठी तसेच रिक्षाचालक-मालकांचे आर्थिक शोषण थांबवण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
- महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष, कष्टकऱ्यांचे नेते डॉ.बाबा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र रि क्षा पंचायत महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष शुभम तांदळे आणि पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष विजय ढगारे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड शहर RTO विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव आणि अश्विनी स्वामी मॅडम यांची भेट घेतली आ णि त्यांना निवेदन सादर केले.
- या भेटीनंतर महाराष्ट्र रिक्षा पंचायत वतीने युवक अध्यक्ष शुभम तांदळे यांनी प्रसिद्ध पत्रक जाहीर केले असून, १५ ऑगस्ट २०२६ पासून पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहरातील पीसीएमसी मेट्रो स्टेशन व आसपासच्या सर्व रिक्षा स्टँडवरून मीटरप्रमाणे सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असल्याचे माहिती दिली आहे.
- पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ओला, उबर आणि रॅपिडोसार ख्या कंपन्यांकडून रिक्षा चालकांचे मोठ्या प्रमाणामध्ये शोषण केले जाते.
- मोठ्या प्रमाणामध्ये कमिशन घेऊन, विविध छुपे खर्च वसू ल करून आणि पिकअप अवर्स मध्ये प्रवाशांकडून जास्त पैसे घेतले जातात, परंतु रिक्षाचालकांना योग्य मोबदला दिला जात नाही. अशा अनेक तक्रारी महाराष्ट्र रिक्षा पंचा यतकडे प्राप्त झाल्या आहेत.
- या अनुषंगाने, १५ ऑगस्टपासून पिंपरी-चिंचवड शहराती ल पीसीएमसी मेट्रो स्टेशनवरून मीटरप्रमाणे रिक्षा व्यव साय सुरू केला जाणार आहे.
- या बैठकीत प्रशासनाच्या वतीने योग्य ती कायदेशीर मदत व सहकार्य मिळण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
- RTO च्या वतीने १५ ऑगस्टपासून पथक तयार करून या सर्व प्रश्नावर देखरेख ठेवण्याबाबत आणि योग्य ती का यदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भात सहकार्य करण्याचे आश्वासन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव सर आणि अश्विनी स्वामी मॅडम यांनी दिले.
- मीटर सक्तीबाबत पिंपरी-चिंचवडमध्ये अधिकारी पथक नेमण्यात येणार आहे.
- या संदर्भात माहिती देताना महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे महा राष्ट्र राज्य युवक अध्यक्ष शुभम तांदळे यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष “कष्टकऱ्यां चे नेते डॉ.बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पिंप री-चिंचवड RTO विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधि कारी राहुल जाधव आणि अश्विनी स्वामी यांची भेट घेतली असता, त्यांनी मीटर संदर्भात विशेष पथक नेमण्याच्या संदर्भात चर्चा केली असून लवकरच एक विशेष पथक नेमण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.”
- शहरात सध्या ५५ हजारांहून अधिक रिक्षा चालक-मालक आहेत. ऑनलाइन अॅप आधारित कंपन्यांमुळे त्यांचा व्यव साय अडचणीत आला असून चालक-मालकांचे शोषण सुरू आहे.
- मीटरने व्यवसाय न केल्याने प्रवाशांचा विश्वासही कमी होत आहे.
- यावर मात करण्यासाठी मीटरने रिक्षा चालवणे आणि ‘शे अर-ए-रिक्षा’ सेवा सुरू करणे हा प्रभावी पर्याय असल्याचे महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष शुभम तांदळे यांनी स्पष्ट केले.
- बोगस रिक्षाचालकांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी व प्रवाशांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी RTO आणि वा हतूक विभागाचे कायदेशीर सहकार्य आवश्यक असल्या ची मागणीही यावेळी करण्यात आली.
- आम्हाला योग्य ते कायदेशीर सहकार्य मिळेल, असा वि श्वास महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे राज्य प्रवक्ते धनंजय कुदळे यांनी व्यक्त केला.
- या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे राज्य युवक अध्यक्ष शुभम तांदळे, राज्य प्रवक्ते धनंजय कुदळे, शहर अध्यक्ष विजय ढगारे पाटील, ‘शेअर-ए-रिक्षा पीसीएमसी मेट्रो’चे अध्यक्ष रोहन जोगदंड, उपाध्यक्ष महेश शिंदे आणि वाहतूक विभागाचे अध्यक्ष देवाप्पा कांबळे उपस्थित होते.
- अधिक माहितीसाठी संपर्क : महाराष्ट्र रिक्षा पंचायत मो.७२७६२३२४२४ / ९८५०७३२४२४
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






