परंडा तहसील कार्यालयात जन्म नोंद प्रमाणपत्रांचा खोळंबा; नागरिकांचे हेलपाटे थांबवून प्रश्न तातडीने मार्गी लावा!नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांची तहसीलदार निलेश काकडे यांच्याकडे आक्रमक मागणी.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा येथील तहसी ल कार्यालयामध्ये जन्म नोंद प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या परं डा शहर व ग्रामीण भागातील गोर-गरीब नागरिकांची मो ठी हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
  • मागील तब्बल दोन वर्षांपासून शेकडो नागरिकांची प्रमाण पत्रे तहसील कार्यालयात धूळखात पडून असून, दररोज हेलपाटे मारून नागरिक पुरते वैतागून गेले आहेत.
  • या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेत परंडा नगरपरिष देचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी बुधवारी तहसील दार निलेश काकडे यांची भेट घेऊन नागरिकांचा हा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याची जोरदार मागणी केली.
  • दोन वर्षांपासून दाखले प्रलंबित मिळालेल्या माहितीनुसा र, जन्म नोंद दाखल्यासाठी अर्ज केल्यानंतर सर्वसाधारण पणे महिना-दोन महिन्यात मिळणारे प्रमाणपत्र मिळवण्या साठी नागरिकांना येथे वर्षानुवर्षे वाट पाहावी लागत आहे.
  • शहर व परिसरातील ग्रामीण भागातून येणाऱ्या गोर-गरीब नागरिकांना वारंवार तहसील कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत.
  • कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे आणि प्रशासकीय अनास्थेमुळे सामान्य जनतेला नाहक आर्थिक व मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
  • अतिरिक्त कर्मचारी नेमण्याची मागणीया पार्श्वभूमीवर, नग राध्यक्ष जाकीर सौदागर यांनी प्रत्यक्ष तहसीलदार निलेश काकडे यांची भेट घेऊन प्रशासनाच्या या संथ कारभाराब द्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.
  • “अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागात अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.
  • कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यास कामाचा निपटारा जलद गतीने होईल आणि सामान्य नागरिकांचे हेलपाटे थांबती ल,” असे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी यावेळी प्रशास नाला सुनावले.
  • तहसीलदारांचे आश्वासन; अंमलबजावणीकडे लक्षदरम्या न, तहसीलदार निलेश काकडे यांनी या समस्येवर गांभीर्या ने विचार करून प्रलंबित दाखल्यांचा प्रश्न लवकरात लव कर मार्गी लावण्याचे आश्वासन नगराध्यक्षांना दिले आहे.
  • मात्र, या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणा र आणि धूळखात पडलेल्या प्रमाणपत्रांना कधी मुहूर्त मि ळणार, याकडे आता संपूर्ण परंडा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles