सोनारी जि.प. शाळेच्या आंदोलनाला मोठे यश; चार वर्षांच्या प्रतीक्षेन्यानंतर अखेर गणित-विज्ञान शिक्षकाची नियुक्ती..!

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील रिक्त पदांचा प्रश्न आखिरकार आंदोलनाच्या दणक्यामुळे मार्गी लागला आहे.
  • चार वर्षांपासून गणित व विज्ञानचे शिक्षक नसल्यामुळे वि द्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवण्यासाठी ग्राम स्थांनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनाला मोठे यश आले आहे.
  • गुरुवारी शाळेला कुलूप ठोकल्यानंतर, आज शुक्रवारी स काळी धाराशिव जिल्हा परिषद कार्यालयात मुख्य कार्य कारी अधिकारी (CEO) यांच्या दालनाबाहेर विद्यार्थी, पा लक व ग्रामस्थांनी तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले.
  • अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले असून, शिक्षकाच्या नियुक्तीचे आदेश हातात पडल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.
  • तीन तास ठिय्या आणि प्रशासनावर दबाव
  • सोनारी शाळेत गेल्या चार वर्षांपासून (२०२३ पासून) ग णित व विज्ञान यांसारखे महत्त्वाचे विषय शिकवण्यासाठी माध्यमिक शिक्षक, कनिष्ठ लिपिक आणि परिचर ही पदे रिक्त होती.
  • यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी गु रुवारी शाळेला कुलूपबंद केले होते.
  • या आंदोलनाची तीव्रता वाढवत आज शुक्रवारी शेकडो च्या संख्येने पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी धाराशिव जिल्हा परिषदेत धडकले.
  • मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाबाहेर आंदोलकां नी ठिय्या मांडत प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
  • ९ जुलैच्या समुपदेशन बैठकीतील तोंडी आदेश बदलल्या च्या प्रकरणावरूनही संतप्त ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
  • जोपर्यंत अधिकृत नियुक्ती पत्र हातात मिळत नाही, तोप र्यंत मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले.
  • नियुक्ती पत्र हातात पडल्यावर आंदोलन मागे
  • आंदोलनाची वाढती धग आणि पालकांची आक्रमक भूमि का पाहून प्रशासनाला तात्काळ सूत्रे हलवावी लागली.
  • या दबावानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत सोनारी शाळेसाठी गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकाचे अधिकृ त नियुक्ती आदेश तयार करून आंदोलकांच्या सुपूर्द केले.
  • शिक्षकाची अधिकृत नियुक्ती आणि कागदपत्रांची पूर्तता झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ग्रामस्थांनी आपले ठिय्या आं दोलन यशस्वी घोषित करत मागे घेतले.
  • मोठ्या संख्येने सहभाग
  • या यशस्वी आंदोलनात शाळा व्यवस्थापन समितीचे (मा ध्यमिक) अध्यक्ष दीपक सुरवसे, प्राथमिकचे अध्यक्ष गणे श फले व सोनारी येथील ।शेकडो पालक, शाळकरी विद्या र्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी ग्रामस्थांनी दाख वलेल्या या एकत्र शक्तीमुळे चार वर्षांचा प्रश्न सुटल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles