
परंडा माळी गल्लीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी; गरजू विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप.
- प्रतिनिधी : फारूक शेख :- परंडा येथील मंगळवार पेठे तील माळी गल्ली येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली.
- या कार्यक्रमाप्रसंगी नगराध्यक्ष सौदागर यांच्या हस्ते अ ण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
- जयंतीचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी म्हणून उ पस्थित गरजू विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनचे वाटप कर ण्यात आले.

- या कार्यक्रमाला नगरसेवक वाजिद दखनी, बब्बू जिनेरी,रा हुल बनसोडे, शरीफ तांबोळी, सत्तार भाई पठाण, तनवीर मुजावर, इरफान भाई शेख आणि नसीर शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
- तसेच तानाजी शिंदे (बर्फी वाले), संजय घाडगे, कय्युम तु टके, संजय श्रीहरी नाईकवाडी, नंदू शिंदे, आप्पाराव बन सोडे, घाडगे, संजय शिंदे, बागा शिंदे, जुबेर पठाण, शिवा जी मेहर व वैभव पवार यांसह परिसरातील नागरिक मो ठ्या संख्येने उपस्थित होते.
- हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंतीचे मुख्य आयोज क जयंत शिंदे, घनश्याम शिंदे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






