
भाकरी फिरवण्याची वेळ आलीय; भाजपा कोणाच्या बापाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही!माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा आमदार राणाजगदीतसिंह पाटील यांच्यावर नाव न घेता घणाघात; बसवराज पाटील यांच्या सत्कार सोहळ्यात कडाडले.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- धाराशिव जिल्हात “भारतीय जनता पक्ष हा लोकशाही मानणारा कार्यकर्त्यां चा पक्ष आहे.
- हा पक्ष कोणत्याही एका विशिष्ट कुटुंबाच्या मालकीचा नाही, किंवा ही कोणाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही,” अशा कडक शब्दांत माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला.

- नवनवाचित आमदार बसवराज पाटील यांच्या भव्य स त्कार सोहळ्यात बोलताना ठाकूर यांनी दिलेला हा इशारा आता राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरला आहे.
- नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत भा जपचे बसवराज पाटील विजयी झाल्याबद्दल त्यांच्या नाग री सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
- या सोहळ्याला जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते, पदाधि कारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- या जाहीर मंचावरून सुरेशशेठ ठाकूर यांनी स्थानिक नेतृ त्त्वाच्या मनमानी कारभारावर आणि हुकूमशाही प्रवृत्तीवर थेट बोट ठेवले.
- कार्यकर्त्यांची गळचेपी सहन करणार नाहीआपल्या आक्र मक भाषणात सुरेशशेठ ठाकूर म्हणाले की, पक्षाला जि ल्ह्यात वाढवण्यासाठी हजारो निष्ठावान कार्यकर्त्यांनी र क्ताचे पाणी केले आहे.
- परंतु, गेल्या काही काळापासून पक्षाला स्वतःची जहागीर समजून काही लोक मनमानी कारभार करत आहेत.
- कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली जात असून, निर्णय प्रक्रियेत त्यांना डावलले जात आहे. ही हुकूमशाही यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला.
- बसवराज पाटील यांच्या रूपाने नवा आशेचा किरण आम दार बसवराज पाटील यांच्या विजयाचे कौतुक करताना ठाकूर म्हणाले की,बसवराज पाटील यांच्या रूपाने जि ल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला हक्काचा नेता मिळा ला आहे.
- आता पक्षात ‘भाकरी फिरवण्याची’ वेळ आली असून, नि ष्ठावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
- ठाकूर यांच्या या विधानामुळे जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत कलह आणि गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे.
- या सत्कार सोहळ्याला उपस्थित कार्यकर्त्यांनी ठाकूर यां च्या भूमिकेला टाळ्यांच्या कडकडाटात पाठिंबा दिला.
- ठाकूर यांनी थेट नाव घेतले नसले, तरी त्यांचा रोख थेट आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावरच होता,अशी चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.
- आगामी काळात जिल्ह्यातील भाजपमधील हा अंतर्गत वाद कोणते नवीन वळण घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






