
लांजा तालुक्यातील युवा नेतृत्व सचिन बेर्डे यांच्या संघर्षाला अखेर मोठे यश; पाळ्टॊक धनगरवाडी शाळेसाठी निधी मंजूर.
- प्रतिनीधी : लांजा : प्रमोद तरळ :-तालुक्यातील पाळ्टॊ क धनगरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र मांक ५ मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून स्वतःच्या शाळेअभावी दुसऱ्यांच्या अंगणात शिक्षण घ्यावे लागत असल्याची बाब समोर आल्यानंतर युवा नेतृत्व स चिन बेर्डे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाह णी केली.
- विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय पाहून त्यांनी प्रशासना ला धडक पत्र पाठवत कठोर शब्दांत जाब विचारला.

- “या चिमुकल्या मुलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क नाही का ? स्वतःची शाळा नसल्यामुळे दुसऱ्याच्या अंगणात शिक्ष ण घेण्याची वेळ का आली? याला जबाबदार कोण?” असे सवाल करत त्यांनी तात्काळ नवीन शाळा मंजूर करण्या ची मागणी केली.
- तसेच मागणी मान्य न झाल्यास लांजा येथे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
- सचिन बेर्डे यांच्या या ठाम भूमिकेनंतर अखेर प्रशासनाने पाळ्टॊक धनगरवाडी शाळेसाठी निधी मंजूर करून मंजु रीपत्र जारी केले.
- विशेष म्हणजे, या मंजुरीपत्राची प्रत लांजा पंचायत समि तीच्या सभापती मॅडम यांच्या हस्ते सचिन बेर्डे यांना सुपूर्द करण्यात आली.
- त्यामुळे या संघर्षाला मोठे यश मिळाल्याची भावना परिस रात व्यक्त होत आहे.
- मात्र,सचिन बेर्डे यांनी केवळ शाळेचा प्रश्नच उपस्थित केले ला नाही. या प्रकरणातील इतर अनेक मुद्द्यांवरही त्यांनी प्रशासनाकडे उत्तरे मागितली असून त्यांची सखोल चौक शी करण्याची मागणी कायम आहे.
- आता सर्वांचे लक्ष एका प्रश्नाकडे लागले आहे…
- शाळेची मंजुरी मिळाल्याने सचिन बेर्डे आपले आंदोलन मागे घेणार, की उर्वरित मागण्यांसाठी आणि जबाबदारां वर कारवाई होईपर्यंत संघर्ष अधिक तीव्र करणार….?
- या निर्णयाकडे आता संपूर्ण लांजा तालुक्याचे लक्ष लागले असून पुढील भूमिका काय असेल, याची उत्सुकता सर्वां नाच आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






