
सालेगाव पाणीप्रश्न: “पाणी नाही तर सालेगाव स्वतंत्र कसले? गुलामासारखे जगणार नाही!” – ‘भीम पँथर’चे अध्यक्ष डॉ. प्रतीक सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार प्रशासनाला १५ ऑगस्टचा अंतिम अल्टिमेटम…..!
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- लोहारा तालुक्याती ल सालेगाव येथील तीव्र पाणीटंचाई आणि रखडलेली पा ण्याची समस्या तातडीने सोडवावी या मागणीसाठी साले गावच्या ग्रामस्थांनी ३ ऑगस्ट रोजी तीव्र उपोषण सुरू केले होते.
- या आंदोलनाची दखल घेत माननीय आमदार प्रवीण स्वा मी सर यांनी मध्यस्थी केली.

- तसेच लोहारा तालुक्याचे उपविभागीय अधिकारी (SDO) अनिल साहेब, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी (BDO) यांनी येत्या १० ऑगस्टच्या आत सालेगावचा पा णीप्रश्न कायमचा मार्गी लावू, असे स्पष्ट आश्वासन दिले.
- प्रशासनाच्या या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपले उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
- “पाणी मिळेपर्यंत सालेगावात स्वातंत्र्य नाही!” – अध्यक्ष डॉ.प्रतीक सूर्यवंशी यांचा आदेश:सालेगावकर गेल्या अने क दिवसांपासून पाण्याच्या थेंबाथेंबासाठी संघर्ष करत आहेत.

- या पार्श्वभूमीवर ‘भीम पँथर सामाजिक संघटने’चे अध्यक्ष डॉ. प्रतीक सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संघटनेने आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला कडक शब्दांत निर्वाणीचा इशारा दिला आहे.
- ग्रामस्थांनी थेट सवाल केला आहे की, “देश स्वतंत्र झाला तरी सालेगावात पाणी नाही. पाण्यासाठी जर लोकांना वणवण फिरावे लागत असेल, तर सालेगाव अजून स्वतंत्र झालेले नाही.
- पाण्यासाठी आम्ही गुलामासारखे जगणार नाही….! ३ ऑ गस्टचे उपोषण प्रशासनाच्या विनंतीवरून केवळ १० ऑ गस्टपर्यंत स्थगित केले आहे.

- जर दिलेल्या मुदतीत गावाला हक्काचे पाणी मिळाले ना ही, तर १५ ऑगस्ट रोजी सालेगाव ग्रामपंचायत कार्यालया समोर तीव्र उपोषण छेडण्यात येईल.
- पाण्याचा प्रश्न न सुटल्यास स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायतीमध्ये अधिकृत ध्वजारोहण (झेंडावंदन)करू दिले जाणार नाही.
- ‘जिथे विषय गंभीर, तिथे भीम पँथर खंबीर’, या न्यायाने सालेगावकर आता आरपारची लढाई लढतील.
- “शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती आणि पाठिंबा: या उपोषण आंदोलनाचे नेतृत्व आणि सहभाग तानाजी(भाऊ)पाटील, रत्नदीप बाडूरे, कुलदीप बाडूरे, आकाश (भाऊ) घोडके, जोती महादेव गोरे, सखूबाई कमलाकर देशपांडे, महादेवी विठ्तल लोंढे, बेबाबाई दयानंद चंडके, महानंदा नेताजी घोडके, आशा गोविंद गुरव, आनिता बालाजी धनेराव, ल क्षाबाई हनुमंत भालेराव, जोती व्यंकट गुरव, अर्चना भग वान गुरव, सुसाबाई नागनाथ घोडके, सुगला संजू घोडके, लता दत्तात्रय शिंदे, विमल शंकर भालेराव, आकाश कम लाकर घोडके, सचिन दयानंद चंडके, विकास संजय घोड के, पवन दिलीप चंडके, विकास तुकाराम सुरवसे, बबन सुधारक वाघमारे, तानाजी यादव भालेराव, अमोल सुमित भालेराव, विकास प्रशांत कांबळे, तुकाराम भीमसेन माने आणि राजेंद्र लक्ष्मण भालेराव यांच्यासह सालेगावच्या शे कडो महिला व पुरुष ग्रामस्थांनी केले होते.

- प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नाही, तर १५ ऑगस्ट रो जी ग्रामपंचायतीमधील आंदोलन ऐतिहासिक आणि अधि क तीव्र असेल,असा एकमुखी निर्धार ‘भीम पँथर सामाजि क संघटना’ व सालेगावच्या ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






