“नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस” नामकरणासाठी मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांचा पुढाकार.

  • प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :- आधुनिक मुंबईचे आ द्य शिल्पकार जगन्नाथ ऊर्फ नाना शंकरशेट यांच्या १६१ व्या पुण्यतिथीनिमित्त आज मुंबईत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून भावपूर्ण पुण्यस्मरण करण्यात आले.
  • या प्रसंगी मुंबईचे उपमहापौर श्री. संजय घाडी यांनी मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामकरण ‘नाना शंकरशेट मुंबई टर्मिनस’ करण्यासाठी पालिका व प्रशासकीय पातळीवर विशेष पु ढाकार घेणार असल्याचे जाहीर केले.
  • दिवसभरात मुंबईतील नानांच्या स्मृतींशी जोडलेल्या विवि ध ऐतिहासिक ठिकाणी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि नानाप्रेमींनी एकत्र येत त्यांना अभिवादन केले.
  • नाना शंकरशेट चौक: नाना शंकरशेट चौकातील त्यांच्या पु तळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
  • यावेळी महापालिकेच्या ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.संतोष साळुंके आणि स्थानिक नगरसेवक ॲड. गौरंग जव्हेरी प्रामुख्याने उपस्थित होते.
  • मध्य रेल्वे मुख्यालय: मध्य रेल्वेच्या मुख्य इमारतीच्या दर्श नी भागावर असलेल्या नानांच्या ऐतिहासिक कोरीव पुत ळ्याला पुष्पहार अर्पण करून रेल्वे क्षेत्रातील त्यांच्या अमू ल्य योगदानाचा गौरव करण्यात आला.
  • मुंबई महानगरपालिका सभागृह: महानगरपालिका मुख्या लयातील सभागृहात असलेल्या नाना शंकरशेट यांच्या तै लचित्रास उपमहापौर श्री.संजय घाडी, अतिरिक्त आयुक्त श्री.संजोग कबरे आणि महापालिका सचिव श्री.मनोज कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
  • एशियाटिक सोसायटी: एशियाटिक सोसायटी येथील नानांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
  • या प्रसंगी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.विनय सहस्र बुद्धे आणि सर्व समिती सदस्यांनी उपस्थित नानाप्रेमींचे उत्साहात स्वागत केले.
  • या पुण्यस्मरण सोहळ्यास अखिल भारतीय दैवज्ञ समाजो न्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ.गजानन रत्नपारखी, नाना शंक रशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.सुरेंद्र शंकरशेट, सरचिटणीस ॲड.मनमोहन चोणकर, चंद्रशेखर दाभोळकर, दिनकर बा यकेरीकर, डॉ.विवेक रायकर, रविंद्र माहिमकर, विजय पि तळे, दिलीप मालांडकर यांसह शंकरशेट कुटुंबीय आणि मुंबईतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles