
प्रवेशाचा गोंधळ : राज्यातील सुमारे २०० विधी महाविद्यालये ‘कॅप राऊंड’ मधून वगळली; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम.
- प्रतिनीधी : सोलापूर : भारत अंकुश साळुंके :-महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell) सुरू असलेल्या एलएलबी तीन वर्षे व पाच वर्षे अभ्यासक्र माच्या प्रवेश प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
- राज्यातील सुमारे २०० विधी महाविद्यालयांचा तात्पुरता ‘कॅप राऊंड’मधून समावेश करण्यात आलेला नसल्याने ह जारो विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महाविद्यालयांकडे बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) ची मान्यता किंवा संबंधित विद्यापीठाची संलग्नता यासंदर्भातील आवश्यक कागदप त्रे अपूर्ण असल्याने या महाविद्यालयांचा कॅप प्रवेश प्रक्रिये त समावेश करण्यात आलेला नाही.
- या निर्णयामुळे अनेक नामांकित व अनुदानित विधी महा विद्यालयांनाही फटका बसला आहे.
- उच्च शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, ज्या महाविद्याल यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून मान्यतेची प्रक्रिया पूर्ण केली आहे किंवा प्रक्रिया सुरू केली आहे, त्यांचा पु ढील टप्प्यात कॅप राऊंडमध्ये समावेश करण्यात येणार आहे.
- त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठे वता अधिकृत प्रवेश प्रक्रियेतील अद्ययावत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

- दरम्यान, विधी शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाची बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) मान्यता, विद्यापीठ संलग्नता आणि अधिकृत कॅप यादीतील समावेश यांची खात्री करूनच प्रवेश निश्चित क रावा, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले आहे.
- वार्ताहर : भारत अंकुश साळुंके, सोलापूर
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






