हिशोब हा व्यवसायाचा आत्मा – सीए गार्डी मॉडर्न महाविद्यालयात वाणिज्य दिन साजरा

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :- वाणिज्य शाखेमधील अर्थ शास्त्र हा एक महत्त्वाचा विषय आहे. ज्या क्षेत्रात पैशाचा संबंध येतो, तिथे वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना संधी मिळते.
  • हिशोब हा कोणत्याही व्यवसायाचा आत्मा असतो, तर पै सा हा रक्त आहे. पैसारुपी रक्त थांबले तर व्यवसाय कोलमडतो.
  • विद्यार्थ्यांना प्राप्त केलेल्या पदवीमुळे नोकरी मिळेल, पण कौशल्य अंगीकारले तर त्यांच्या करियरला योग्य आकार प्राप्त होईल.
  • त्यामुळे फक्त पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर वेगवेगळी कौशल्य अंगीकारणे गरजेचे आहे. असे मत आय.सी.ए. आय, पिंपरी चिंचवड शाखेचे माजी अध्यक्ष सनदी लेखा पाल सुहास गार्डी यांनी व्यक्त केले.
  • निगडी येथील मॉडर्न कनिष्ठ महाविद्यालयात “आंतरराष्ट्री य वाणिज्य दिन”साजरा करण्यात आला.
  • यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्या वंदना सोनोने, सम न्वयक सुजाता बलकवडे, वंदना पांडे आणि विद्यार्थी उप स्थित होते.
  • यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बजेटवर लघु नाटि का सादर केली आणि संयुक्त भांडवल कंपन्याच्या करप्र णालीवर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केले.
  • सीए गार्डी पुढे म्हणाले की, कोणत्या क्षेत्रात जायचे ते ध्ये य निश्चित करा आणि त्या मार्गावर आपली वाटचाल सुरु करा. कॉमर्स क्षेत्रात करियरच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
  • ज्या क्षेत्रात जायचे ध्येय निश्चित केले आहे, त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. समाजमाध्यमांमुळे माहिती घेणे किंवा शिकणे सोपे झाले आहे.
  • मोबाईलवरील समाजमाध्यमांवर अनेक प्रलोभने दाखव ली जातात परंतु, त्यांना बळी न पडता, मोबाईलचा अभ्या सासाठी योग्य वापर करणे गरजेचे आहे.
  • चांगल्या मित्रांची संगत करणे, अवांतर वाचन करणे, आप ले आदर्श कोण आहेत हे पाहणे. यांमुळे आपण ठरवलेले ध्येय गाठणे सुकर होईल.
  • ध्येय निश्चिती केल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी वेगवेगळी कौशल्य प्राप्त करण्यासाठी भरपूर कोर्सेस आहेत.
  • याची तयारी अगोदर करावी लागेल. योग्य मार्गदर्शन घ्या वे. आपले सुप्त गुण ओळखून, समाज, आई-वडील,मित्र, स्वतः केलेला अभ्यास यांच्याद्वारे विद्यार्थी ज्ञान आत्मसात करत असतो.
  • शिक्षण घेत असताना फायनन्स, सेवा, उत्पादन यांचे देखी ल कौशल्य आत्मसात करावे.
  • जीएसटी, टॅली असे विविध संगणकीय कोर्सेस करा सीए ऑफिस मध्ये इंटरशिप करा वाणिज्य संबंधातील बेसिक फंडामेंटल कोर्सेस, अकाउंटस संबंधी प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी केले पाहिजेत.
  • मुख्याध्यापिका वंदना सोनोने आपल्या अध्यक्षीय भाषणा त म्हणाल्या की, गृहिणी या उत्तम व्यवस्थापक असतात. मिळालेल्या उत्पन्नामधून काही भाग भविष्यातील तरतुदीं साठी काढून ठेवतात. आर्थिक नियोजन करण्याचे बाळक डू घरातूनच मुलांना मिळत असते.
  • समाजकारण, राजकारण व अर्थकारणावर देशाची प्रगती अवलंबून असते. तरुणांनी आत्मनिर्भर होणे, आर्थिक सा क्षर होणे गरजेचे आहे.
  • व्यापार करणे म्हणजे केवळ नफा मिळविणे नाही, तर रो जगार देखील उपलब्ध करून देणे होय. देशाच्या अर्थव्य स्थेला बळ देण्यासाठी वाणिज्य शाखा महत्त्वाची भूमिका बजावते.
  •  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक सुजाता बलकवडे यांनी केले.
  • सूत्रसंचालन अनघा जोशी यांनी केले, तर आभार पूनम बा गुल यांनी मानले. प्रमुख्याध्यापक योगेश ठिपसे यांनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले.
  • सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे या कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles