CCMP-BHMS नोंदणीविरोधात PCMC PGI, YCMH येथे निवासी डॉक्टरांचे आंदोलन; ५७ पीजी डॉक्टरांचा सहभाग.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :-पिंपरी, पुणे: महाराष्ट्र शासना ने CCMP पूर्ण केलेल्या BHMS डॉक्टरांना महाराष्ट्र मे डिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत PCMC PGI, YCMH, पिंपरी येथील निवासी डॉक्टरांनी आज शांततापूर्ण निषेध आंदोलन केले.
  • या आंदोलनात एकूण ५७ पदव्युत्तर (PG) निवासी डॉक्ट रांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
  • आधुनिक वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता, रुग्णांची सुरक्षित ता आणि पुराव्यावर आधारित वैद्यकीय सेवांचे संरक्षण या प्रमुख मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी शासनाकडे नि र्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली.
  • राज्यभरातील निवासी डॉक्टर संघटनांकडून याच मुद्द्याव र आंदोलन सुरू असून अनेक ठिकाणी नियमित सेवांमधू न प्रतीकात्मक माघार घेण्यात आली आहे.
  • या आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष डॉ.महागुंड्या वस्त्रद, उपा ध्यक्ष डॉ.मिहीर जैन, उपाध्यक्षा डॉ.अंकिता पोल, तसेच सरचिटणीस डॉ. सौरभ रामाणे आणि डॉ. प्राची मोरे यांनी केले.
  • पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, निवासी डॉक्टरांचा हा लढा कोणत्याही वैद्यकीय पद्धतीच्या विरोधात नसून आधुनिक वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता, वैद्यकीय नियमनाची स्पष्ट ता आणि रुग्णहित जपण्यासाठी आहे.
  • आंदोलनादरम्यान सर्व सेवा शांततेत पार पडल्या असून निवासी डॉक्टरांनी शासनाने संबंधित निर्णयाचा फेरविचा र करून वैद्यकीय क्षेत्रातील सर्व संबंधित घटकांशी चर्चा करावी, अशी मागणी केली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles