
खासगी वाहनांवर ‘पोलीस’ नाव किंवा लाल पाटी लावल्यास होणार कारवाई; अप्पर पोलीस महासंचालक यांचे आदेश.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- मुंबई राज्यातील पो लीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या खासगी वाहनांव र ‘पोलीस’ (Police) अशा स्वरूपाचे नाव किंवा लाल पा टी लावण्यावर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली असू न, असे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे कड क निर्देश अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्याल याने दिले आहेत.
- खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर‘पोलीस’ लिहि लेल्या पाट्यांचा वापर करून अवैध कृत्ये केली जात अस ल्याच्याआणि लोकांमध्ये दहशत निर्माण होत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

- अवैध कामांसाठी गैरवापर आणि हायकोर्टाची नाराजीया संदर्भातील एका तक्रार अर्जाची दखल घेत अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने (महामार्ग वाहतूक पोलीस) ३१ जुलै २०२६ रोजी अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.
- राज्यातील अनेक पोलीस कर्मचारी आपल्या वैयक्तिक वा हनांवर लाल पाटी किंवा लाल अक्षरात ‘पोलीस’ लिहून प्रवास करतात.
- अशा वाहनांवर ‘पोलीस’ लिहिलेले असल्याने सहसा पो लीस नाकाबंदी किंवा तपासणी दरम्यान ही वाहने तपास ली जात नाहीत.
- याच गोष्टीचा फायदा घेऊन अनेकदा ही वाहने भाडेतत्त्वा वर दिली जातात आणि त्यातून अवैध वस्तूंची ने-आण के ली जात असल्याचे समोर आले आहे.
- उच्च न्यायालयानेही (High Court) या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत अशा वाहनांवर कडक कारवाई कर ण्याचे निर्देश दिले आहेत.
- मोटार वाहन कायद्यांतर्गत होणार दंडात्मक कारवाई मि ळालेल्या निर्देशानुसार, यापुढे कोणत्याही खासगी वाहना वर ‘पोलीस’ नावाची पाटी किंवा तसे अक्षर आढळल्यास संबंधित वाहन चालकावर महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ च्या कलम १३३(६) सह मोटार वाहन कायदा १९ ८८ च्या कलम १७७ अन्वये तात्काळ दंडात्मक आणि का यदेशीर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस अधीक्षकां ना देण्यात आले आहेत.
- सर्व पोलीस घटकांनी आपापल्या कार्यक्षेत्रात या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जेणेकरून पोलिसांच्या नावा चा गैरवापर रोखता येईल आणि कायद्याची अंमलबजाव णी चोखपणे होईल, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






