
साक्री तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला तहसील कार्यालय साक्री येथे दुपारी ३ वाजता होणार आरक्षण सोडत.
- प्रतिनिधी : हर्षल ठाकरे :-साक्री तालुक्यातील अनुसूचि त क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळता इतर सर्व बिगर अनुसू चित क्षेत्रातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत आयोजित करण्यात आली आहे.
- महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनु सार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मा गास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे.
- Q

- साक्रीचे उपविभागीय अधिकारी शुक्ला भाग धुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपा री ३ वाजता तहसील कार्यालय, साक्री येथे आरक्षण सोड तीचे आयोजन करण्यात आले आहे.
- या आरक्षण सोडतीमध्ये (1) लोणखेडी (2) कळंभीर (3) वसमार (4) अष्टाणे (5) कोकले (6) आयणे (मळखेडे), (7) मलांजन (8) निळगव्हाण (9) म्हसदी प्र.नेर (10) नागपूर (व) (11) नाडसे (12) शेनपूर (13) अक्कलपाडा (14) बळसाणे (15) विटाई (16) कासारे (17) भडगाव (व) (18) तामसवाडी (19) धाडणे (20) गणेशपूर (21) हटटी बु./घाणेगाव (22) नांदवन/कोकले (23) चिंचखेडे (24) फोफादे (25) निजामपुर (26) वाजदरे (27) अंबा पूर (28) छडवेल प (29) ऐचाळे (30) बेहेड (31) दुसा णे (32) काळगाव (33) सैयदनगर/इच्छापुर (34) भामेर (35) खोरी (36) प्रतापपुर (37) भाडणे/गोंदास (38) उभंड (39) उंभर्टी (40)नवडणे/सायणे (41) फोफरे (42) म्हसाळे (43) इंदवे (44) भागापुर (45) सातरपाडा (46) दातर्ती/गंगापुर (47) दिघावे (48) कावठे (49) व र्धाणे (50) हटटीखु, (51) वेहेरगाव/रोजगाव, (52) कका णी/भडगाव (53) आखाडे (54) महिर (55) शेवाळी मा (56) उभरांडी/होडदाणे (57) शेवाळी दा. (58) कढरे (59) जैताणे (60) खुडाणे (61) मालपुर (62) धमणार (63) जामदे (64) उंभरे (65) छावडी/आमोदे (66) दार खेल (67) सतमाने (68) छाईल या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
- आरक्षण सोडतीसाठी साक्री तालुक्यातील संबंधित ग्रामपं चायतींचे नागरिक, सदस्य, ग्रामस्थ तसेच सर्व राजकीय प क्षांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार साक्री यांनी केले आहे.

- आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या आर क्षण सोडतीकडे साक्री तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






