
परंडा शहरात जिल्हा पोलीस प्रमुख रितू खोकर यांचा पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून जाहीर सत्कार; कायदा व सुव्यवस्थेवर झाली सविस्तर चर्चा.
- प्रतिनिधी : परंडा :- फारूक शेख :- धाराशिव जिल्ह्या च्या पोलीस अधीक्षक (जिल्हा पोलीस प्रमुख) रितू खोकर या परंडा शहर दौऱ्यावर आल्या असता, शहरात पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा जा हीर सत्कार करण्यात आला.
- पोलीस प्रमुख रितू खोकर यांच्या परंडा दौऱ्यादरम्यान स्थानिक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत त्यांचे उत्साहात स्वागत केले.

- यावेळी पत्रकार फारूक शेख, पत्रकार विजय मेहर, तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते कानिफनाथ सरपने,जमीर शि कलकर आणि सादिक शेख प्रामुख्याने उपस्थित होते.
- या सर्व मान्यवरांच्या हस्ते जिल्हा पोलीस प्रमुखांना पुष्पगु च्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
- सत्कार कार्यक्रमानंतर उपस्थित पत्रकार आणि कार्यक र्त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख रितू खोकर यांच्याशी पोलीस प्रशासनाच्या सद्यस्थितीतील कामकाजाबाबत सविस्तर चर्चा केली.
- या बैठकीत परंडा शहरासह परिसरातील कायदा व सुव्य वस्था अधिक मजबूत करणे,गुन्हेगारी नियंत्रण,अवैध धंद्यां चे उच्चाटन आणि विविध सामाजिक विषयांवर मोकळ्या मनाने संवाद साधण्यात आला.
- प्रशासनाने जनतेच्या आणि माध्यमांच्या सहकार्याने अधि क गतिमान काम करावे, यावरही यावेळी सकारात्मक चर्चा झाली.
- या प्रसंगी परंडा उपविभागीय पोलीस अधिकारी (DYS P) चोरमले, पोलीस निरीक्षक चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) शिरसट, पोलीस उपनिरीक्षक (PSI) मु ळे, पोलीस उपनिरीक्षक (PSI) आडसूळ तसेच पोलीस प्रशासनातील फिरोज शेख, गायकवाड साहेब, शिंदे साहे ब, गुंडाळे साहेब, जगदाळे साहेब, झाडे साहेब, मेत्रे साहे ब, कनचे साहेब, जाधव साहेब, खताळ, राऊत साहेब, पवार साहेब यांच्यासह पोलीस अंमलदार आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






