
धाराशिव जिल्हा दुष्काळ जाहीर करा भाजपा नेते मा.आ. श्री.सुजितसिंह ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
- प्रतिनीधी : परंडा : फारुख शेख :- धाराशिव जिल्ह्यात पवासाळी हंगामात सरासरी पेक्षा अत्यल्प आणि पावसा त मोठे खंड पडल्याने जिल्ह्यातील खरीप हंगामातील सो याबीन, तुर, उडीद, मुग इत्यादी सर्वच पिके वाया गेल्याने आणि निसर्गाचा लहरीपणा, बदलते हवामान आणि गतव र्षी झालेली अतिवृष्टी व महापूर यामुळे शेतकरी संकटात सापडला असून संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळी जाहीर करून भरीव मदतीचे पॅकेज शेतकऱ्यांना देण्याची मागणी भाजपा नेते मा.आ.श्री. सुजितसिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

- मा.आ.श्री.सुजितसिंह ठाकूर यांनी निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील परंडा, भूम, वाशी, तुळजापुर, धाराशिव, कळंब, उमरगा व लोहारा या आठही तालुक्यात खरीप हंगाम २०२६ मध्ये एकुण ५,३९,०२७ हेक्टर क्षेत्राव र खरीप पिकांची पेरणी झाली असुन त्यापैकी सर्वाधिक सोयाबीन ४,६७,३२२ हेक्टर (८६.७०%), तुर ३४,८३१ हे क्टर (६.६४%), उडीद २१,८८६ हेक्टर (४.०६%) व मुग ५,५४४ हेक्टर (१.०३%) इतकी पेरणी झाली आहे.
- जिल्ह्यातील विविध तालुक्यात यावर्षीच्या पावसाळ्यात जुन महिण्यात २२ दिवस, जुलै महिण्यात १२ दिवस, ऑ गस्ट महिण्यात २५ ते ३० दिवस व सब्टेंबर महिष्यात १९ दिवसाचा पर्जन्य खंड पडला असुन जुन ते सब्टेंबर या काळात जिल्ह्यात जवळपास ९० दिवसाहून अधिक प र्जन्य खंड पडला आहे.
- प्रल्पांत केवळ ८% पाणी
- धाराशिव जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु असे २२५ प्रकल्प असुन या प्रकल्पांची एकुण पाणी साठा क्षमता ७२५.४० द.ल.घ.मी. इतकी आहे.
- सद्यस्थितीत या प्रकल्पांमध्ये पावसाळा संपत आला अस तानाही केवळ ८% इतका अत्यल्प पाणी साठा असुन शेत कऱ्यांना आत्ताच पाणी टंचाईच्या तिव्र झळा सहन करा व्या लागत आहेत.
- सद्यस्थितीत जिल्ह्यातील मोठ्या पर्जन्य खंडामुळे जवळ पास सर्वच क्षेत्रावरील खरीप पिके करपुन गेली आहेत.
- चालू खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद व मुग इत्यादी पिके पुर्णपणे करपुन गेल्याने शेतकरी सोयाबीन व इतर पिके जनावरांना चारा म्हणुन वापर करीत आहेत.
- आता यापुढे पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाऊस पड ला तरीही पिकांची जैविकवाढ व उत्पादन घटकांची पुर्नः स्थापना होणे शक्य नाही.
- पाणी पातळीत घट
- निवेदनात पुढे म्हटले आहे की,जिल्ह्यातील सब्टेंबर२०२६ मध्ये सरासरी पाणी पातळी ९.५३ मी. असुन मागील ५ वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत ०७.०२ मीटरने खालावली आहे.
- जिल्ह्यातील पाणी पातळी खालावल्याने फळबागा व ऊ स पिकही वाळत आहे. पाण्या अभावी करपलेल्या फळ बागा व ऊस पिकाचेही पंचनामे करून त्या शेतकऱ्यांनाही शासनाने मदत करण्याची आवश्यकता पडणार आहे.
- चारा छावण्या, टॅंकर व रोहयोची कामे
- धाराशिव जिल्हा हा सातत्याने अवर्षण प्रवण व दुष्काळी जिल्हा असल्याने या जिल्हयातुन उदर निर्वाहासाठी अन्य ठिकाणी स्थलांतर करणाऱ्या लोकांचे प्रमाणही अधिक आहे.
- जिल्ह्यात अनेक गावांना सद्या तिव्र पाणी टंचाईस तोंड द्यावे लागत असुन पुढे मोठ्या प्रमाणात गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागणार आहे.
- तर पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या तसेच रोजगार हमीची कामेही मोठ्या प्रमाणात काढावी लागणार आहेत.
- तरी शासनाने तातडीने संपुर्ण धाराशिव जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भरीव आर्थिक मदत करून दुष्काळा त करावयाच्या सर्व उपाययोजना, पिण्याच्या पाण्याचे टँ कर, जनावरांच्या चारा छावण्या व रोजगार हमीचे कामे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफी तसेच विविध सवलती व योजनांची कार्यवाही तातडीने करण्याची मागणी या निवेदनात भाजपा नेते मा.आ.श्री. सुजितसिंह ठाकूर यांनी केली आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/





