
अडचणीच्या काळात शेतकऱ्यांसोबत महायुती सरकार: आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या पाठपुराव्याला यश; धाराशिवसह भूम, परंडा, वाशी तालुके दुष्काळग्रस्त जाहीर.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- महाराष्ट्रातील दुष्का ळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या बळीराजाला दि लासा देण्यासाठी महायुती सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
- राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील सर्व आठही तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
- विशेष म्हणजे भूम, परंडा आणि वाशी या तिन्ही तालुक्यां ना दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री तथा संपर्कमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला हो ता, ज्याला आता मोठे यश आले आहे.

- या निर्णयामुळे जिल्ह्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना शास नाकडून विविध सवलती आणि आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
- तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील: प्रा.डॉ. तानाजीराव सावंत”चालू वर्षात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडला होता.
- भूम, परंडा आणि वाशी तालुक्यांसह संपूर्ण धाराशिव जि ल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक होती.
- महायुती सरकार हे पूर्णपणे शेतकऱ्यांचे सरकार असून,अ डचणीच्या काळात आम्ही बळीराजाला वाऱ्यावर सोडणा र नाही.
- हाच शब्द पाळत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे सतत पाठपुरावा करून धाराशिवमधील सर्व तालु क्यांना दुष्काळी सवलती मंजूर करून घेतल्या आहेत.
- शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,” असा विश्वास प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी व्यक्त केला.
- दुष्काळ जाहीर झाल्यामुळे मिळणारे मुख्य लाभ व सवल ती: जमीन महसुलात सूट आणि शेती पंपांच्या चालू वीज बिलात सवलत.
- शेतकी कर्जाचे पुनर्गठन करून वसुलीस स्थगिती. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी.
- पिण्याच्या पाण्याचे टँकर्स आणि जनावरांच्या छावण्यांची तातडीने उभारणी.
- रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोहयोच्या (EGS) निकषात शिथिलता.

- महायुती सरकारच्या या धाडसी आणि शेतकरीभिमुख नि र्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील तसेच भूम, परंडा आणि वाशी परिसरातील शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असून, आमदार डॉ.तानाजीराव सावंत यांचे आभार मान ले जात आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






