धाराशिव जिल्ह्यातील एकमेव नगरअध्यक्ष जाकीर सौदागर यांचा गणेश मंडळांतर्फे जाहीर सत्कार.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा शहरात कौतु काचा वर्षावपरंडा:गणेश विसर्जन दिनाचे औचित्य साधून परंडा शहरातील सर्व गणेश मंडळांच्या वतीने नगरअध्यक्ष जाकीर सौदागर यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला.
  • परंडा शहरात यंदा १० ते १२ सार्वजनिक गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली होती.
  • दरवर्षी प्रशासनातर्फे किंवा लोकप्रतिनिधींतर्फे गणेश मंड ळांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा परंड्यात उलटे चित्र पाहायला मिळाले.
  • नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या अष्टपैलू आणि सर्व समावेशक कार्याचा गौरव करण्यासाठी सर्व गणेश मंडळां च्या अध्यक्ष व उपाध्यक्षांनी एकत्र येत स्वतः नगरअध्यक्षां चाच जाहीर सत्कार केला.
  • या आगळ्यावेगळ्या कृत्याची सध्या संपूर्ण धाराशिव जि ल्ह्यात आणि विशेषतः परंडा शहरात जोरदार चर्चा सुरू असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
  • विकासात्मक कामे आणि सामाजिक बांधिलकी ठरली कारणीभूतनगरअध्यक्ष जाकीर सौदागर यांनी परंडा शहरा चा चेहरामोहरा बदलण्यासाठी गेल्या काही काळात उल्ले खनीय कामे केली आहेत.
  • शहरातील मुख्य रस्ते, प्रलंबित असलेले गटार पाण्याचे प्र श्न मार्गी लावण्यासोबतच, शहरासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या नवीन स्मशानभूमीचे बांधकाम त्यांनी अत्यंत तत्परतेने पूर्ण करून घेतले आहे.
  • त्यांच्या या विकासकामांबद्दल शहरवासीयांमध्ये समाधा नाचे वातावरण आहे.जाती-पातीच्या पलीकडे जाऊन सर्व धर्मीय उत्सव साजरे करणारे नेतृत्वजाकीर सौदागर यांची ओळख केवळ विकासकामे करणारे लोकप्रतिनिधी म्हणू न नाही, तर ‘मोकळ्या मनाचा माणूस’ अशी आहे.
  • शहरात शिवजयंती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती, राष्ट्रमाता जिजाऊ जयंती असो वा गणेशोत्सव— यात्रा/उरूस सर्व महापुरुषां च्या जयंत्या आणि धार्मिक उत्सवांना ते जात-पात, लहान -थोर असा कोणताही भेदभाव न करता मोकळ्या हाताने आणि मोठ्या मनाने आर्थिक वर्गणी (मदत) देतात.
  • प्रत्येक समाज घटकाला सोबत घेऊन चालण्याच्या त्यां च्या या वृत्तीमुळेच सर्व गणेश मंडळांनी कृतज्ञता म्हणून हा सत्कार केला.
  • गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान अत्यंत उत्साही वाताव रणात हा सत्कार सोहळा पार पडला.
  • याप्रसंगी शहरातील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्य क्ष, कार्यकर्ते आणि हजारो नागरिक उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles