चिखलीत डॉ.मृणाल दळे हिचा श्री संताजी सेवा मंडळाच्या वतीने विशेष नागरी सत्कार….!

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- विद्यार्थी आपल्या आयु ष्यात यशाच्या कितीही मोठ्या शिखरावर पोहोचला, तरी त्याने आपल्यासाठी अहर्निश कष्ट करणाऱ्या आई-वडिलां च्या त्यागाची आणि उपकारांची जाणीव सदैव मनात ठेव ली पाहिजे.
  • पालकांनी स्वतःच्या अनेक गरजा, सुख-सोयी बाजूला ठे वून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शिक्षणासाठी आर्थिक तरतूद केलेली असते; याचे भान प्रत्येक तरुणाने ठेवणे गरजेचे आहे, असे भावुक व मार्गदर्शक प्रतिपादन पोपट पिंगळे यांनी केले.
  • चिखली येथील डॉ.मृणाल राजेंद्र दळे हिने नुकतीच वैद्य कीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘फिजि ओथेरपी’ ही पदवी यशस्वीरीत्या संपादन केली आहे.
  • तिच्या या दैदिप्यमान यशाची दखल घेत श्री संताजी सेवा मंडळ, चिखली यांच्या वतीने आयोजित करण्यात आले ल्या विशेष सत्कार समारंभ प्रसंगी ते प्रमुख वक्त म्हणून बोलत होते.
  • कार्यक्रमा दरम्यान मंडळाचे अध्यक्ष अमित शिंदे यांनी डॉ. मृणाल हिचे कौतुक व अभिनंदन करत, “मिळालेल्या वैद्य कीय ज्ञानाचा व कौशल्याचा उपयोग समाजातील गोरगरी ब, गरजू आणि वंचित घटकांची सेवा करण्यासाठी करा वा,” असा मोलाचा सल्ला दिला.
  • तसेच, विनायक गाताडे यांनी डॉ.मृणाल यांना भविष्याती ल वाटचालीसाठी शुभेच्छा देताना सांगितले की, “केवळ एखाद्या ठिकाणी नोकरी करण्यापुरते मर्यादित न राहता, उत्तम अनुभव व सराव मिळवून भविष्यात स्वतःचे भव्य हॉस्पिटल सुरू करून रुग्णसेवेचा नवा आदर्श निर्माण करावा.”
  • कुटुंबाच्या बिकट व जेमतेम परिस्थितीवर मात करत मि ळवलेल्या या यशाबद्दल बोलताना शिवाजी अंबिके म्हणा ले की, “अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि अखंड मेहनतीच्या जोरावर डॉ.मृणाल यांनी वैद्य कीय क्षेत्रात मिळवलेले हे यश चिखलीतील इतर सर्व तरु ण-तरुणींसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.”
  • या सोहळ्यास अमित शिंदे,मनोहर जाधव, रवींद्र हरकुळ कर, राजेश डोंगरे,शिवाजी अंबिके,विनायक गाताडे,महेश देशमाने,ज्ञानेश्वर वाघ, शुभम अंबिके उपस्थित होते.
  • सर्वांनी डॉ.मृणाल दळे हिच्या भावी वाटचालीस आणि उ ज्ज्वल भविष्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles